नांदेड : उज्वला गुरसुडकर
सर्वसामान्य जनतेलाच नाही तर नेतेमंडळींसाठीही यावर्षीची लोकसभा निवडणुक विलक्षण व अविस्मरणीय ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसुन येत आहे.
आगामी २०२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी ही राजकीय पक्ष, राजकिय नेतेमंडळी व सर्वसामान्य जनतेच्या आठवणीत राहणारी आहे. कारण सरकारच्या कार्यप्रणालीवर सर्वसामान्य जनतेच्या नजरेत महागाई व बेरोजगारी, असे अनेक मुद्दे बसवण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यात गेले अनेक दिवसांपासून पक्ष बदल व विशेष म्हणजे “मराठा आरक्षणावर” वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण उदयास आलेले दिसुन येत आहे. इतर राजकीय घडामोडी शेतीमाल भाववाढ अशा अनेक प्रश्नांना खतपाणी घालण्याचे प्रकार निदर्शनास आलेले आहेत विरोधीपक्षनेते, “मराठा आरक्षण” मुद्द्याला हत्यार बनवून विशिष्ट प्रकारच्या राजकीय खेळी खेळत असल्याचे जाणवले.
यापुर्वी सामान्य जनतेला राजकारण काय हे कधी समजलेच नव्हते. पण २०१४ च्या निवडणूकी नंतर जनतेला हे ज्ञान चांगल्या प्रकारे अवगत झाले आहे. सत्तर वर्षांच्या कालावधीत लोकांना देशांचे मुख्यमंत्री व पंतप्रधान कोण असे विचारने कठीण होते, पण सध्या असा काही बदल देशातील जनतेत च नाही लहान मुलांना सुद्धा सहज पणे समजतं असल्याचे जाणवते. नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठमोठ्या नेत्यांच्या सभा, भेटीगाठी प्रचार प्रसार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला प्रचंड वेग आला आहे. जागोजागी बैठकांचे प्रमाण वाढले आहे, सामान्य जनतेला ही निवडणूक रणांगणावरील चर्चा करण्याचे जणू वेड लागल्याचे दिसून येत आहे.
राजकीय पक्षांनी स्वतः च्या प्रचार आणि प्रसारासाठी एकमेकांच्या पक्षाची बाजू कमकुवत करणे व स्वतः च्या पक्षाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अहोरात्र झटणारे असल्याचेही दिसून येत आहे.
लोकसभा निवडणूक उद्देश म्हणजे च देशांचा विकास. खासदार चे कार्य काय तर देशाला विकसित करणे. गेलीं अनेक वर्ष सत्तेवर असूनही त्यांच्याकडून जनतेच्या व देशाच्या विकासाची कामे करणे झाली नाहीत ते आता यापुढे तरी काय करणार..? तर दुसरीकडे विरोधक म्हणताहेत की सत्तर वर्षाचा कालावधीतील सरकार हे सामान्य जनतेला न समजणारे गणितं होते, परंतु मागच्या दहा वर्षाच्या कारकीर्दीतील सरकार हे विकसित देशांचे उदाहरण ठरले आहे.
इतर देशांच्या तुलनेत भारत देश हा एकदम शेवटच्या स्टेजवर होता, तर सध्या तो सर्वोत्तम ठरलेला आहे. म्हणून च मतदारांनी यावेळीही विचारपूर्वक निर्धार करूनच मतदान करावे, पश्चातापाची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्लाही मतदारांना दिला जातो आहे.
सर्वसामान्य जनता सुद्धा पुर्वी सारखी राहिलेली नाही आत्तापर्यंतच्या निवडणूका पाहाता पक्ष कुठलाही असो निवडणूकीचा काळ पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अति उत्साहाने निवडणुकीचे रणांगण गाजवत, बजावत, प्रचार करत असत. पण सध्या तसें काहीही नाही. यावेळी मात्र चक्क याउलट चित्र पहावयास मिळत आहे. आता कार्यकर्त्यांचा उत्साह अत्यल्प झाल्यामुळे नेतेमंडळी ची चांगलीच तारांबळ उडाली आहे . “मराठा आरक्षण” मुद्द्यावरुन महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी नेत्यांना ग्रामीण भागात प्रचार करणेही अत्यंत कठीण झाले आहे. सत्ताधारी पक्षावर नाराज असलेल्या जनतेने यावर्षीच्या निवडणूक प्रणालीला वेगळे वळण देण्याचा अट्टाहास स्विकारला आहे.