नांदेड : उज्वला गुरसुडकर
कंधार येथील योगशिक्षक निळकंठ मोरे यांच्या प्रयत्नातून कोरोना महामारीच्या भयंकर अशा काळात शासनाच्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सचा वापर करावा म्हणून आणि आपल्याच नेहमीच्या लोकांबरोबरच परिसरातील व महाराष्ट्रातील योगावर प्रेम करणाऱ्या योग साधकांना योगाचा लाभ कसा करून देता येईल याकरिता 3 एप्रिल 2021 पासून ऑनलाईन गुगल मीट लाईव्ह योग वर्गाच्या माध्यमातून दररोज पहाटे 5 ते 7 या वेळात योगवर्ग सुरू करण्याचा संकल्प केला तेव्हापासून सातत्याने हा गुगल मिट लाईव्ह योगवर्ग चालू आहे.
पहिला वर्धापन दिन शेगाव येथे दुसरा नांदेड तर तिसरा विक्की गार्डन लोहा येथे दिनांक 6 व 7 एप्रिल रोजी लोहा येथे योग शिक्षक नीळकंठ मोरे, मंजुषा संचेती व विलास बिरादार यांच्या प्रेरणेतून हा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 150 योगसाधक उपस्थित होते.
दिनांक 6 एप्रिलला संध्याकाळी सर्व योग साधकांनी लोहा येथे विक्की गार्डन मंगल कार्यालयात एकत्र येऊन आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुण, संगीत, एक अंकी नाटिका, गझल गायन, लावणीनृत्य असे 40 योग साधकांनी आपल्या कला सादर केल्या. विशेष म्हणजे यावेळी छायाताई कागने, उषाताई गुट्टे व मनीषा मंगनाळे या भगिनींनी योग साधनेचे महत्व सांगणारी छोटीशी नाटिका सादर केली. सौ. रोहिणीताई घुमे यांच्या लावणी नृत्याने तर कार्यक्रमाची रंगत वाढवली. सुवेदा देवकते या छोट्या मुलीनी नृत्य सादर केले. यावेळी पेटीवादक रामेश्वर स्वामी यांनी छान साथ देऊन आई वर सुरेल असे गीत सादर केले.
“ज्योत से ज्योत जगाते चलो.प्रेम की गंगा बहाते चलो”. या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
दिनांक 7 एप्रिल च्या पहाटे साडेपाच वाजता ब्रम्ह मुहूर्तावर एक दिवसीय योग शिबिरास वंदे मातरम् या राष्ट्र गीताने सुरूवात होऊन सात वाजता शांती पाठाने सांगता झाली. तसेच सर्व योग साधक बांधव भगिनींनी योग साधनेमुळे झालेले फायदे. कोणकोणत्या आजारपणातून मिळालेली मुक्तता या विषयावर प्रा. लीलाताई आंबटवाड, प्रा. विद्याताई फड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर अल्पोपहार घेण्यात आला. प्रत्येकानी आपला परिचय करू देताना मनोगतात योगामुळे झालेले फायदे सांगितले.
विक्की गार्डन मंगल कार्यालयाचे संचालक विश्वंभर मंगनाळे व शिवसेना नेते एकनाथ पवार यांनी योगा शिबीरास हजेरी लावली. त्यांचा सत्कार नीळकंठ मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी योग साधकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले यावर्षीप्रमाणे दरवर्षी विक्की गार्डन निःशुल्क सेवेसाठी देण्यात येणार आहे. तसेच सर्व योग भगिनी व बांधवांना सांगितले की विक्की गार्डन खूप मोठे आहे तर या वर्षी पेक्षा पुढील वर्षी या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली पाहिजे. यावेळी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार तसेच लोहा तालुक्याचे तहसीलदार विठ्ठल परळीकर व कंधार तालुक्याचे
तहसीलदार रामेश्वर गोरे व स्वीप मध्ये काम करणाऱ्या संतोषीताई देवकते यांनी या योग शिबिरास भेट देऊन योग साधकांना 100 टक्के मतदान करण्यासंदर्भात जनजागृती करून प्रतिज्ञा म्हणून घेऊन शपथ दिली. त्यावेळी अरुण संगेवार म्हणाल्या, आपणास लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सुज्ञ आणि तज्ञ व्यक्तींनी या निवडणुकीमध्ये 100 टक्के सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
तसेच दुर दुरून आलेल्या गुगल मीट योग वर्गांतील बंधू भगिनींना भेटून आनंद व्यक्त केला व होळीच्या रंगाची उधळण मोठ्या प्रमाणात झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोविंद बिरादार यांनी केले. योग शिक्षक नीळकंठ मोरेंनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अजय कदम ,ॲड वसंत पाटील, शंकरराव वारकड, शिवकुमार मंगनाळे, देविदास जंगमे, लक्ष्मण नलाबले, नवनाथ बोबडे, शिवानंद स्वामी, अनिल वट्टमवार, परमानंद व्यास महाराज, गोविंद बिरादार, अशोक पांडे, विलास बिरादार, तिरुपती गुट्टे, विवेकानंद आंबाटे, पांडुरंग शिरगिरे, नवलभाई संचेती, वामन राठोड, प्रकाश धोरण, राजेश राऊत, पवन कंधारे, बालाजी गुरसुडकर, माधव आंबटवाड, सुनील आंबटवाड, शिवनंदाताई नाईकवाडे, आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला जवळपास दिडशे बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला होता.