मंगळवेढा : अभिजीत बने
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव मंडळ मंगळवेढा यांचेवतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय राचाप्पा माळी यांनी दिली.
गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमा प्रतिष्ठापना व पूजन मंगळवेढा पंढरपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार समाधान आवताडे व रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व जकराया शुगरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जाधव हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सौ. अरुणाताई माळी, श्रीमती ललिता माळी, बाळासाहेब माळी, दत्तात्रय माळी, शंकर बापू माळी, गोपीनाथ माळी, नंदकुमार माळी, दिगंबर यादव, बाबा कोंडूभैरी, पांडुरंग मेहरकर, नारायण गोवे, युवराज शिंदे, प्रदीप खांडेकर, अशोक माळी, शंकर माळी, तुकाराम कुदळे, सदाशिव माळी, ॲड. नंदकुमार पवार, महादेव जाधव, चिदानंद माळी, डॉक्टर नितीन आसबे, डॉक्टर महेश माळी, पांडुरंग राचाप्पा माळी, पांडुरंग नकाते, चंद्रकांत पडवळे, सोमनाथ आवताडे, महादेव आबा माळी, शरणाप्पा माळी, दत्तात्रेय लाळे, विजय बुरकुल, सौ, संगीता कट्टे, श्रीमती लक्ष्मीबाई भीमदे, सौ. सत्यभामा भीमदे, सौ. अश्विनी माळी, सौ. अनिता माळी, शिवाजी जाधव, शिवराज पट्टणशेट्टी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता हभप लक्ष्मण महाराज राजगुरू बावडा ता. इंदापूर जि. पुणे यांचे नाचू भारुडाच्या रंगी हा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक व संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या हस्ते व धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी तानाजी खरात, रामकृष्ण नागणे, गौरीशंकर बुरकुल, अरुण किल्लेदार, ॲड. शैलेश हावनाळे, ज्ञानेश्वर भीमदे, राहुल वाकडे, सिद्धेश्वर आवताडे, अजित जगताप, गोपाळ भगरे, प्रवीण खवतोडे, युनूस शेख, चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष वाले, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, रामचंद्र कापशीकर, चंद्रकांत काकडे, राजेंद्र घोडके, बजरंग सुरवसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवेढ्यातील माळी गल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय माळी, उपाध्यक्ष आशुतोष माळी, धनाजी माळी, सुरेश माळी, दामाजी माळी, कार्याध्यक्ष राजेश माळी, सहकार्याध्यक्ष सचिन माळी, कोषाध्यक्ष दिगंबर माळी, सहकोषाध्यक्ष सागर माळी, सचिव दत्तात्रय कोरे, सहसचिव मनोज माळी यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुकाराम भिमदे, राजेंद्र माळी, दामाजी माळी, संदीप माळी, सखाराम माळी, जयंत तोडकरी, राहुल माळी, नितीन माळी, संजय माळी, महेश भिमदे, तुषार भीमदे, सोमनाथ माळी, उत्तम माळी, तुकाराम माळी, शंकर माळी, पंडित माळी, सागर माळी, सिद्धेश्वर माळी, विठ्ठल माळी, गणेश माळी, सुरेश कट्टे, मुरलीधर माळी, विजय माळी, चंद्रशेखर कोले, राजू भीमदे, धनाजी माळी, बाळासाहेब थोरवत, रामलिंग स्वामी, शत्रुघ्न माळी, संतोष माळी, दयानंद माळी, राजेश आहेरवाडी, अमोल माळी, प्रवीण माळी, विश्वंभर माळी, गणेश माळी, आदित्य माळी, राजेश माळी, अर्जुन माळी, अलोक मेहेरकर, गणेश चौखंडे, जगदीश रणदिवे, बसवेश्वर माळी, विक्रम माळी, प्रमोद माळी, सतीश माळी, अविनाश माळी, नवनाथ गायकवाड, अण्णाराज घोळसंगी, सागर ननवरे, आशिष मेहेरकर, सुमित वांढरे, श्रीपाद माळी, काशिनाथ गाडवे, शक्ती रेवे, शुभम माळी, श्रीशैल्य भीमदे आदि प्रयत्नशील आहेत.