बोराळे : राजकुमार धनवे
महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेच्या महिला विभागप्रमुख व स्तंभलेखिका भारती धनवे यांनी लिहिलेल्या दर्शनमात्रे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज शुक्रवार दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे यांचे अमृतहस्ते संपन्न होणार आहे.
हा प्रकाशन सोहळा ढगे डिजिटलच्या सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी हे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे दुसरे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे, नगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी अर्चना जनबंधु हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दर्शनमात्रे पुस्तकाच्या अंतरंगावर युवा साहित्यिका निकिता पाटील व प्रा. विश्वनाथ ढेपे हे भाष्य करणार आहेत.
दर्शनमात्रे हे पुस्तक सोलापूरच्या गौरव साहित्यालयाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. विद्यासागर पाटंगणकर यांनी प्रस्तावना दिली आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश जडे यांचे पाठबळ या पुस्तकाला लाभले आहे.
नाट्य, निवेदन यासह साहित्य क्षेत्रात देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका भारती धनवे यांचे लेखन दर्शनमात्रे या पुस्तकाच्या स्वरूपात पहिल्यांदाच वाचकांसाठी येत आहे. या पुस्तकाबद्दल वाचकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.