टीम लोकमन नंदुर |
मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील ग्रामदैवत बिरोबा यात्रेनिमित्त शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी भव्य जंगी कुस्त्या व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.
पैलवान रामा शेळके विरुदध तेजस काळे यांच्यात ५१००० हजार रुपयाची प्रथम क्रमांकाची कुस्ती, बाळकृष्ण शेळके विरुदध अजय नागणे यांच्यात ३१००० रुपयाची द्वितीय क्रमांकाची कुस्ती, सौरभ घोडके विरुद्ध ज्योतीबा लोखंडे यांच्यात २५००० हजार रुपयाची तृतीय क्रमांकाची, प्रविण पवार विरुद्ध श्रीनिवास भोसले यांच्यात २१००० हजार रुपयाची चतुर्थ क्रमांकाची कुस्ती खेळविण्यात येणार आहे. याशिवाय इतर नामवंत मल्लाच्या कुस्त्याही खेळविण्यात येणार आहेत.
सकाळी ११ ते २ वाजेपर्यत कुस्त्या नेमले जातील. पैलवान दामोधर घुले हे कुस्ती निवेदक तर परसुराम चौगुले, परमेश्वर येणपे, महालिंग मनगेनी, हरि हेगडे, दामोधर कांबळे, लक्ष्मण पवार हे पंच म्हणून काम पाहणार आहेत. दिनांक २६ रोजी सकाळी ९ वाजता बिरलिंगेश्वर गायन संघ मुगळ्याळ सुमित्रा व आमोगसिदध गायनसंघ झाकीर कारकल यांच्यात ढोलकीची गाणी होणार आहे. दिनांक २७ रोजी सायंकाळी साडेसात वाजता सप्तसुर कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे.