टीम लोकमन उमदी |
उमदी ता. जत येथील म्हेत्रे हॉस्पिटल मध्ये बुधवार दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मोफत त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती म्हेत्रे हॉस्पिटलचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन म्हेत्रे यांनी दिली.
सदरचे मोफत त्वचारोग तपासणी शिबिर म्हेत्रे हॉस्पिटल सलगर रोड, उमदी ता. जत जि. सांगली येथे बुधवार दिनांक १ मे रोजी सकाळी ९ ते १ यावेळेत संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये जत येथील तज्ञ डॉक्टर्स डॉ. निलेश ननवरे व डॉ. अश्विनी ननवरे हे रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत.
त्वचारोग, पिंपल्स उपचार, गजकर्ण, नायटा, ॲलर्जी, इसब, खरुज, सोरायसिस, कोड, काळे व पांढरे डाग, केमिकल पिलिंग, हायड्रो फेशियल, स्किन पॉलिशिंग, प्री पार्टी, प्री मॅरेज पिल (त्वचेवर ते आणणे), चेहऱ्यावरील मुरूम व खड्ड्यांचा उपचार, वांग, चेहरा सुरकुतणे व डोळ्याखालील डागांचा उपचार, आर एफ द्वारे मस व तीळ काढणे, चाय पडणे, केस गळणे व केसातील कोंड्याचा उपचार, गोंदण व टॅटू काढून टाकने (एनडीयाक लेझर) इत्यादी समस्यांवर तपासणी केली जाणार आहे.
म्हेत्रे हॉस्पिटल उमदी येथे होणाऱ्या या मोफत त्वचारोग तपासणी शिबिराचा उमदी व परिसरातील गरजू रुग्णांनी रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन म्हेत्रे हॉस्पिटलचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन म्हेत्रे व डॉ. सौ अश्विनी म्हेत्रे यांनी केले आहे. रुग्णांनी अधिक माहितीसाठी ९१५८१६६८७१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे म्हेत्रे हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे.