ब्रह्मपुरी : संजय कुलकर्णी
शिवकृपा पेट्रोल पंप ब्रह्मपुरी येथे भव्य लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी पेट्रोल पंपावर संपन्न झाला. स्वर्गीय शिवाजी (आण्णा)शामराव पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण आणि स्वर्गीय विवेकानंद शिवाजी पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून लकी ड्रॉ कार्यक्रमाची सोडत संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजन सर्जेराव पाटील, डॉ. वृषाली शिवाजी पाटील, तानाजी शामराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
ब्रह्मपुरी येथील शिवकृपा पेट्रोल पंपाचे मालक स्वर्गीय विवेकानंद शिवाजी पाटील यांचा स्मृतिदिन प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्याचे कार्य येथील शिवकृपा परिवाराकडून करण्यात येते. मागील काही वर्षात भव्य कथाकथन, कवीसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, महिला मेळावा असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
यावर्षी स्वर्गीय शिवाजी अण्णा यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त व स्वर्गीय विवेकानंद पाटील स्मृतीदिनानिमित्त भव्य लकी ड्रॉ योजना मागील एक महिन्यापासून ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेली होती. यात लक्षणीय असा प्रतिसाद ग्राहकांकडून प्राप्त झाला. लकी ड्रॉची सोडत मंगळवार १४ मे रोजी पेट्रोल पंपावर काढण्यात आली. यात प्रथम भाग्यवान ग्राहकास ४६ इंची स्मार्ट टीव्ही, द्वितीय भाग्यवान ग्राहकास स्मार्टफोन, तृतीय भाग्यवान ग्राहकास जम्बो कुलर आणि उत्तेजनार्थ दोन ग्राहकास मिक्सर आणि स्मार्ट वॉच भेट देण्यात आले. पंपावरील उपस्थित ग्राहकांमधूनच सोडतीचे कुपन काढण्यात आले. यातील भाग्यवान ग्राहक अनुक्रमे महेश सरवळे, गणेश पवार, प्रमोद पाटील शशिकांत जाधव, प्रवीण बेंदरे हे आहेत. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमास शिवकृपा पेट्रोल पंपाचे सुमित्रा शिवाजी पाटील, शिवकृपा भारत गॅसचे आनंद पाटील, विशाल पाटील, नांदेड येथील प्राध्यापक गणेश पाटील, बँक ऑफ महाराष्ट्र ब्रह्मपुरी शाखेचे उपव्यवस्थापक श्री कुलकर्णी, सोलापूर येथील गोविंद पवार, पत्रकार प्रमोद बिनवडे, महेंद्र पुजारी, किशोर देशमुख, दत्तात्रय रणे, अरविंद डोके, आदिनाथ पुजारी, नवनाथ देशमुख, प्रवीण पाटील, देवराज पाटील, दादा पाटील, नामदेव निकम व परिसरातील सहभागी ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवकृपा पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक औदुंबर पाटील, संजय कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.