टीम लोकमन मंगळवेढा |
चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला दिला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
चार जूनपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार
मनोज जरांगे पाटील म्हणाले, 21 ते 24 तारखेपर्यंत दौरा आहे. त्यामुळे मी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. आम्हाला लोकसभेच्या गुलालात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे. आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आमचे लोकं मोठे झाले तर त्यांचे कल्याण होईल. त्यामुळे आमच्या न्यायासाठी आम्ही अंतरवालीत पुन्हा एकदा एकवठणार आहोत.
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि हैदराबादचा गॅझेट लागू करा
मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. हैदराबादचा गॅझेट लागू करावा, याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत. ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.