टीम लोकमन मरवडे |
‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे ब्रीदवाक्य घेऊन ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करत शताब्दी पूर्ण करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मरवडे याप्रशालेने बारावी बोर्ड परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा 96.06 टक्के निकाल लागला असून महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रशालेतील विज्ञान शाखेचा 97.3 व कला शाखेचा 93.5 टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेमध्ये पूजा राजेंद्र बंदाई हिने 81.63 टक्के गुण मिळवून महाविद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला. तर मुस्कान दावल नदाफ ही 81.50 टक्के गुण मिळवून द्वितीय आली. नम्रता उत्तम फटे ही 77.83 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
कला शाखेमध्ये आकांक्षा आनंदा टोमके ही 65.50 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली. तर सृष्टी दयानंद शिवशरण ही 63.80 टक्के गुण मिळवून द्वितीय आली. हर्षद महादेव आवताडे याने 57 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिक्षक प्रा. महावीर कांबळे, प्रा. आयाप्पा कोरे, प्रा. अक्षय टोमके, प्रा. कुणाल पाटील प्रा. रणजीत नागणे, प्रा. मंगेश वनखंडे, प्रा. श्रीमती मनीषा नागटिळक, प्रा. दत्तात्रय ढावरे, उपप्राचार्य हणमंत केंदुळे प्राचार्य हणमंत वगरे यांचेसह प्रशालेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन ॲड. नंदकुमार पवार, राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक सुरेश कुलकर्णी, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य डॉ. राजेंद्र जाधव, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य तथा उद्योजक बसाप्पा येडसे, गोविंद चौधरी, माजी प्राचार्य साहेबराव पवार, माजी प्राचार्य संभाजी रोंगे, माजी प्राचार्य अंबादास पवार, माजी प्राचार्य महादेव डांगे, विश्वनाथ माने सर, मनोहर बनसोडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी, प्राथमिक शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, माजी सरपंच दादासाहेब पवार, अशोक भाऊ पवार, शिवाजी पवार, नितीन घुले, अजित पवार, भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम कोळी, अण्णासाहेब जाधव सर, उद्योजक दत्तात्रय गणपाटील, कुमार सूर्यवंशी, संतोष गणपाटील, गणेश पाटील, ॲड. राजाराम येडसे, प्रा. बाळासाहेब माने, भारत मासाळ सर, सेवानिवृत्ती विस्तार अधिकारी डॉ. माणिक पवार, शंकर बनसोडे सर, राजाराम कालिबाग, माजी उपसरपंच रजाकभाई मुजावर, माजी उपसरपंच अल्लाबक्ष इनामदार, मेजर हरिभाऊ चौधरी, नितीन साठे सर, संजयमामा काळे, नंदकुमार जाधव, किसन रोंगे, सिद्धेश्वर रोंगे सर, संतोषकुमार पवार, मोहन सरडे, पांडुरंग मोरे, आनंदराव जावळे, डॉ. आनंद पवार, प्रमोद पकाले, राजाराम मस्के, दत्तात्रय वाघ, सोपान कोलते, अनिकेत दत्तू, प्रा. विठ्ठल काटकर, बाळासाहेब पडवळे, मेजर राहुल शिंदे, हणमंत सुतार, शहाजहान मुलाणी, धनश्री पतसंस्थेचे व्यवस्थापक विक्रम जगताप, ब्रह्मदेव कुंभार, विनायक लवटे, तानाजी सूर्यवंशी, आनंद चौधरी, विठ्ठल फटे, युवराज सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, योगेश शिंदे, अमीर मनेरी, प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी
राष्ट्रवादीचे युवक नेते सचिन घुले, ज्येष्ठ नेते सुभाष जगताप, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार, प्रा. राजाराम पवार, मरवडेच्या सरपंच पुनम दौलत मासाळ, उपसरपंच दीक्षा शिवशरण, कुस्तीगीर परिषदेचे पैलवान दामोदर घुले, हैदर केंगार, डॉ. अतुल निकम, बापू सपताळ, समाधान ऐवळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिभाऊ जाधव, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब तेली, युवक नेते धन्यकुमार पाटील, शहाजी पवार सर, ज्ञानेश्वर कुंभार सर, गोविंद मासाळ, राजाराम कदम सर, केंद्रप्रमुख निवृत्ती सूर्यवंशी, साधनाताई जाधव, प्राचार्य राजेंद्र पोतदार, महेश गायकवाड, सोमनाथ टोमके, निवृत्ती जाधव सर, सुरेश रोंगे, संदीप सूर्यवंशी, श्रीकांत गणपाटील, प्रा. बाळासाहेब भगरे, प्रा. वनमाला भगरे, तेजस गणपाटील, तंत्रस्नेही शिक्षक नवनाथ जाधव, मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. दत्तात्रय शिंदे, ग्रामविकास अधिकारी राखी जाधव, पांडुरंग जाधव, ॲड. प्रकाश घुले, दामाजी कारखान्याचे माजी संचालक नामदेव गायकवाड सर, शशिकांत घाडगे, निलेश स्वामी, संग्राम सपताळ, शिवाजी केंगार, सिताराम फटे गुरुजी, जयश्री घुले मॅडम, झेप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत मेलगे, पांडुरंग कुलकर्णी गुरुजी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाळ, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी अभिजीत बने, राजकुमार मेहेर सर, युवराज पाटील, हैदर मुलाणी, पर्यवेक्षक हनुमंत केंदुळे, प्राचार्य हनुमंत वगरे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.