टीम लोकमन मंगळवेढा |
शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित स्वर्गीय विठ्ठलराव नारायणराव येलपले जुनियर कॉलेज येड्राव-खवे ता. मंगळवेढा या शाळेने बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा 98.96 टक्के निकाल लागला असून महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा अखंडित ठेवली आहे.
कला विभागातून अश्विनी संतोष नरळे व शुभांगी मधुकर कांबळे या दोन्ही विद्यार्थिनीने 79.17 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला. तर राधा सिद्धू चव्हाण हिने 76.17 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व साक्षी मच्छिंद्र ढावरे हिने 75.67 टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक मिळवला.
विज्ञान विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून प्रथमेश पांडुरंग पांढरे याने 86 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला तर मकरंद विश्वनाथ ढेपे याने 85 टक्के गुण मिळवून द्वितीय तर सार्थक बाळू माने 83.50% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य विश्वंभर काळे यांचेसह प्रशालेतील सर्व शिक्षक, पालक यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक व राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, संस्थेचे सचिव अभिजीत ढोबळे, सौ. क्रांतीताई आवळे, सौ. कोमल ढोबळे-साळुंखे, सौ. शेरॉन ढोबळे, कॉलेजचे प्राचार्य विश्वंभर काळे, उद्योगपती सुरेश येलपले-पाटील, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती भुजंगराव पाटील, मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन जालिंदर माने, माजी उपसभापती काशिनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे, ग्रामपंचायत येड्रावचे सरपंच संजय तुकाराम पाटील, उपसरपंच संजय किसन पाटील, डॉ. विक्रम काळे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.