टीम लोकमन मंगळवेढा |
केंद्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सरोगसीद्वारे माता बनणाऱ्या महिलांनाही १८० दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहे. केंद्रीय नागरी सेवा नियम, २०२४ जारी करून सरकारने हा नवीन नियम लागू केला आहे. दोनपेक्षा कमी अपत्य असतील तरच या नियमाचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे.
याशिवाय जर एखादा सरकारी कर्मचारी सरोगसीद्वारे पिता बनला आणि त्याला दोनपेक्षा कमी मुले असतील तर त्याला मुलाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत 15 दिवसांची पितृत्व रजा मिळेल. हे नवीन नियम 18 जूनपासून लागू झाले आहेत. ज्या दिवशी हे नियम अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाले होते.
सरोगसी म्हणजे काय ?…..
सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेचे गर्भाशय भाड्याने घेऊन तिच्या मदतीने अपत्य जन्माला घालणे. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही. त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मूल होऊ शकते. काही महिला किंवा पुरुष सक्षम नसल्यामुळे किंवा याआधी अबॉर्शन झाल्यामुळे काही कपल्स मूल जन्माला घालू शकत नाही. पण सरोगसीद्वारे पालक बनू शकतात.
सरोगसीचे प्रकार कोणते?
सरोगसीमध्ये आई-वडील होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्यापैकी पुरुषाचे स्पर्म बाळाला जन्म देणाऱ्या महिलेच्या एग्ग्ससोबत मॅच केले जाते याला ‘ट्रेडिशनल सरोगसी’ म्हणतात.
दाम्पत्याचे स्पर्म आणि एग्स टेस्ट ट्यूबमध्ये मिसळून बाळाला जन्म देणाऱ्या महिलेच्या गर्भाशयात इन्सर्ट करण्यात येतात याला ‘जेस्टेशनल सरोगसी’ म्हणतात. त्यामुळे बाळाला प्रत्यक्ष जन्म देणारी महिला वेगळी असते. या महिलेला ‘सरोगेट मदर’ असे संबोधले जाते.