टीम लोकमन मंगळवेढा |
पुण्यातून मोठी बातमी समोर येत असून पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणे आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. झिका रुग्ण आढळलेल्या परिसराचे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. परिसरातील अनेक लोकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
काय आहेत झिका व्हायरसची लक्षणे
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचे प्रजनन होते आणि हे डास घरात राहण्याचे प्रमाण अधिक असते. झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलांमध्ये राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांमध्ये आढळला. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला.1950 सालापर्यंत पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला, 2015-16 मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ म्हणून घोषित केले होते. अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणे झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.