टीम लोकमन सोलापूर |
आषाढी यात्रेनिमित्त संताच्या पालख्यांचा सोलापूर जिल्हात प्रवेश झाला आहे. मोफत दाढी कटींग, मसाज, इस्त्रीची सुविधा या बरोबरच शौचालय व स्नानगृह सुविधा व स्वच्छतेमुळे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बरोबरच इतर आठ पालखी सोहळ्याचा ताण जिल्हा परिषद प्रशासनावर आहे. पालखी सोहळा मुक्कामाचे ठिकाणी भाड्याने स्नानगृह घेण्याऐवजी स्वतः ग्रामपंचायतींनीच स्नानगृह बनविल्यामुळे स्नानगृहाची संख्या वाढली आहे.
पालखी सोहळयात मुक्कामी महिलांना स्नानाबाबत खूप अडचणी येत होत्या. त्या यामुळे दूर झाल्या आहेत. पालखी मार्गावर एक हजार स्वतंत्र स्नानगृहे उपलब्ध करून दिलेली आहेत. अशाच अनेक नाविन्यपूर्ण सुविधा जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. मसाज, स्नानगृह, मोफत दाढी कटींग व कपडे इस्त्री व निवारा केंद्रामुळे पालखीतील वारकरी सुविधाबद्दल समाधानी दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गावर उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद प्रशानाने वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या अन्य सुविधा पुढीलप्रमाणे
स्वच्छता
युध्दपातळीवर स्नानगृहे उभारणे, पालखी तळाचे मजबुतीकरण, शौचालय व इतर सुविधांसाठी नकाशे, स्वच्छतादूत, आरोग्यदूत, मोबाईल आरोग्य पथकामुळे जागेवर उपचाराची सोय, पालखी तळाची स्वच्छता, झाडेझुडपे काढणे, मुरुमीकरण करणे, गावामध्ये ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात त्या ठिकाणी स्वच्छता करून देणे, गावामध्ये जंतुनाशक धूर फवारणी आदी कामे करणेत आली आहेत. जिल्हा परिषदेने इतर ग्रामपंचायतीकडून कर्मचारी व घंटागाड्या तैनात केल्या आहेत.
मोबाईल टॉयलेट
पालखी मार्गावर 3925 मोबाईल टॉयलेट बसविण्यात आले आहेत. 300 स्वयंसेवक कार्यरत आहेत. शौचालयाची वेळोवेळी साफसफाई जेट्टिंग मशीनच्या सहाय्याने केल्यामुळे वेळेत सफाई होत असल्याने शौचालयाचा प्रत्येक ठिकाणी वापर होत आहे. 15 शौचालायामागे एक सफाई कर्मचारी व 25 टॉयलेट मागे एक सुपरवायझर नेमण्यात आला आहे. शौचालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरसाठी पालखी मार्गावर स्वतंत्र फीडिंग पॉइट करून देणेत आला आहे. त्यामुळे टँकर वेळेवर भरून शौचालयाचे ठिकाणी येत आहेत.
विशेष सुविधांमुळे वारकरी समाधानी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी महिला वारकऱ्यांना विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. यामध्ये महिला वारकऱ्यांसाठी तात्पुरते स्वतंत्र स्नानगृहे तयार करण्यात आली आहेत. त्याचा वापर संग्रामनगर, यशवंतनगर, माळीनगर व बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे. पालखीतळाच्या बाजूला महिलांसाठी स्नानगृह व महिलांसाठी शॉवरच्या माध्यमातून अंघोळीची सोय करण्यात आली होती. त्याचबरोबर स्वतंत्र चेंजिंग रूमही तयार करण्यात आल्या होत्या. याचा लाभ हजारो महिला वारकऱ्यांनी घेतला आहे. भंडीशेगाव व पिराची कुरोली व वाखरी येथे देखील सुविधा सज्ज आहेत. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सोयी सुविधाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन
महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आले होते. या माध्यमातून महिलांना मोफत सॅनिटरी पॅड नगरपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले.
हिरकणी कक्ष
लहान मुलांसाठी व स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. त्याठिकाणी पाळणाघर, दूध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती देखील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून वारकऱ्यांना देण्यात येत होती. आशा सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती वारकऱ्यांना करून दिली.
यावेळी जिल्हा परिषद प्रशासन प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पालखी सोहळा प्रमुखांसोबत संवाद साधून वेळापूर, भंडीशेगाव येथील सुविधांबाबत तोडगा काढला आहे. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी भाविकांसाठी विशेषतः महिला भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कौतुक केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांचेसह सर्व गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख व कर्मचारी सुविधा देणे साठी युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत.
मोबाईल चार्जिंग कक्ष व मसाज केंद्र
वारकऱ्यांचे चालून थकत असलेने पाय दाबणेचे मशीन बसविणेत आले आहे. वारकरी या सेवेमुळे तृप्त झाले आहेत. वारकरी निवारा केंद्रात मोबाईल चार्जिंग साठी अनेक पॉईंट काढून देण्यात आले होते. याचा लाभ वारकऱ्यांनी घेऊन समाधान व्यक्त केले आहे.
सुविधांची थोडक्यात महिती
1) प्लास्टिक संकलन केंद्र – 352
2) शौचालय संख्या – 2300
3) स्नानगृहे – 1000
4) पाण्याचे टॅकर – 299
5) टॅंकर फिडींग केंद्र – 791
6) मेडिकल किट – 4500
7) आयसीयू बेड – 163
8) वाॅटरप्रुफ मंडप – 34
9) सॅनिटरी नॅपकीन – 50 हजार
10) मदत केंद्र – 77
11) हिरकणा कक्ष – 91
12) आपत्कालीन केंद्र – 77
13) कपडे बलणेची रूम – 82
14) स्वच्छ असलेले विहीर संख्या – 318
15) स्वच्छ असलेले विधन विहीर संख्या - 377
16) फिरते आरोग्य पथक – 121
17) दर्शन रांग आरोग्य पथक – 37
18) विद्युत रोषणाई-वेळापूर, भंडीशेगाव, पिराची कुरोली, पालखी तळावर 300 आकाशकंदील व विद्युत रोषणाई
जेसीपी मधून पुष्पृष्टी -10 जेसीबी – एक हजार किलो फुले.