टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा येथील संत कान्होपात्रा महिला पतसंस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त बसस्थानक मंगळवेढा येथे पंढरपूर कडे जाणाऱ्या भाविकांना फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. यावेळी तेथील भाविकांना राजगिरा लाडू, केळी, खिचडी व पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मंगळवेढा आगाराचे आगार व्यवस्थापक संजय भोसले, सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे, मंगळवेढा म्युझिक क्लबचे अध्यक्ष लहु ढगे, सुरसंगम फॅमिली क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण नागणे, पत्रकार विलास मासाळ, दावल इनामदार, बाळासाहेब नागणे, संपादक औदुंबर ढावरे, समाधान फुगारे, मंगळवेढा नगरपालिकेचे निवृत्त अभियंता नामदेव काशीद, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन डोरले, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन लक्ष्मण हेंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत कान्होपात्रा महिला पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सीमा भगरे, संचालिका सुवर्णा काशीद, सुवर्णा नागणे, रेश्मा ढगे, रसिका हेंबाडे, पतसंस्थेच्या प्रभारी व्यवस्थापिका करिष्मा मुलाणी यांनी परिश्रम घेतले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या मंगळवेढा आगारातील् चालक, वाहक, एसटी कर्मचारी तसेच अनेक भाविक व महिला उपस्थित होत्या.