टीम लोकमन मंगळवेढा |
रोटरी क्लब ऑफ जुळे मंगळवेढा सिटीचा पदग्रहण समारंभ रविवार दिनांक 21 जुलै रोजी संपन्न होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट रोटेरियन अमोल रत्नपारखी यांनी दिली.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे 2024-25 साठीचे प्रेसिडेंट म्हणून रोटे. अमोल रत्नपारखी तर सेक्रेटरी म्हणून रोटे. अभिजीत बने यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता मंगळवेढा येथील मंगळवेढा पंढरपूर रोडवर असणाऱ्या हॉटेल सुगरणच्या वातानुकूलित हॉलमध्ये होणार आहे.
या पदग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे 2024-25 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. डॉ. सुरेश साबू व रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे 2024-25 च्या असिस्टंट गव्हर्नर पूनम देवदास हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमासाठी रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, असिस्टंट गव्हर्नर, सोलापूर जिल्ह्यातील विविध क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, पास्ट प्रेसिडेंट उपस्थित राहणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे 2023-24 चे प्रेसिडेंट म्हणून रोटे. अमोल रत्नपारखी व सेक्रेटरी म्हणून रोटे. अभिजीत बने यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी रोटरीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. 2023-24 या वर्षात रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीने पर्यावरणाच्या समतोलासाठी भरीव कार्य केले असून वृक्ष लागवड आणि संवर्धन या उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड केली आहे.
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहयोगाने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा दीडशे पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरातील रुग्णांची रोटरी क्लब ऑफ मंगळसिटीचे संचालक व फिजिशियन रोटेरियन डॉ. मनीष बसंतवाणी व रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे संचालक डॉ. अरुणकुमार महिंद्रकर यांनी मोफत तपासणी केली. याशिवाय या शिबिरामध्ये रुग्णांच्या इलेक्ट्रोकार्डिओग्राम, टूडी इको, अँजिओग्राफी, ट्रेडमिल टेस्ट, एक्स-रे, रँडम ब्लड शुगर टेस्ट, रक्त तपासण्या या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच औषधेही रुग्णांना मोफत देण्यात आली. या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून डॉ. समाधान टकले यांनी काम पाहिले होते.
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे तालुक्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या सेमिनार मध्ये मेडिकल कॉलेज इंजीनियरिंग कॉलेज फार्मसी कॉलेज नर्सिंग कॉलेज आयटीआय कॉलेज यांचेसह विविध महाविद्यालयांनी आपले स्टॉल लावले होते. त्यातून त्यांनी माहितीपत्रके विद्यार्थ्यांना दिली व त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. विविध विषयांमधील तज्ञांकडून विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून प्राचार्य रोटेरियन सुधीर पवार यांनी काम पाहिले होते.
रविवार दिनांक 21 जुलै रोजी मंगळवेढा येथील मंगळवेढा पंढरपूर रोडवरील हॉटेल सुगरण येथे सायंकाळी 5.30 वाजता वाजता होणाऱ्या पदग्रहण समारंभासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील रोटेरियन्स आणि रोटरीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे प्रेसिडेंट रोटे. अमोल रत्नपारखी व सेक्रेटरी रोटे. अभिजीत बने यांनी केले आहे.