जत : पांडुरंग कोळळी
लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला डावलले, येणाऱ्या काळात निवडणुकीत भाजप येणार नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे असे मत यावेळी व्यक्त केले. युवा नेते रोहित राठोड यांची जत तालुका विमुक्त जाती भटक्या जमाती तालुकाध्यक्ष निवड झाल्याबद्दल जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथे बंजारा समाजाचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात पहिल्यांदाच सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील या भागात आल्याने काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
खासदार विशाल पाटील म्हणाले, भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते खालच्या स्तराला जाऊन टीका करीत आहेत. मात्र येणारे सरकार हे काँग्रेसचेच असणार त्यामुळे जत तालुक्यातून सक्षम उमेदवार हे विक्रम सावंत आहेत. त्यांना तुम्ही सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. जत तालुक्यातील बंजारा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू, तसेच जतचे प्रश्न प्राधान्याने मी लोकसभेत मांडून आवाज उठवेन, जतचा पाणी प्रश्न, जतला उद्योगधंद्यासाठी प्रयत्न करून जतचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी यापुढे खासदारकी पणाला लावू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री विश्वजीत कदम म्हणाले, जत हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. त्यामुळे विक्रम सावंत यांच्या माध्यमातून जतचा पाणी प्रश्न मिटेल. तरुणांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने डफळापूर येथे श्रीपती शूगर कारखाना उभा केला आहे. यापुढील काळात जतच्या पूर्व भागातील पाणी प्रश्न मिटल्याने मोठा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. बंजारा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अभिवचन यावेळी माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी दिले.
यावेळी आमदार राजेश राठोड म्हणाले, बंजारा समाज मागासलेला आहे. त्यामुळे त्याला प्रवाहात आणण्यासाठी बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आम्हाला काँग्रेस पक्षाची, या नेतेमंडळींची साथ आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आपण सर्वांनी आमदार विक्रम सावंत आणि काँग्रेसला साथ द्यावी. आपले सर्व प्रश्न काँग्रेसच सोडू शकतो दुसरे कोणीही सोडवणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार विक्रम सावंत म्हणाले, जतच्या पूर्व भागातील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी लवकरच कर्नाटकातून तुबची बबलेश्वरचे पाणी येणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटेल. यावेळी युवा नेते रोहित राठोड यांचा सत्कार माजी मंत्री विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार राजेश राठोड, जगनू महाराज, सोलापूरचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय राठोड, लाला राठोड, सौ कांता नाईक, निगडी बुद्रुकच्या सरपंच सौ. सीताबाई हिरामण पवार, सुजय शिंदे, भूपेंद्र कांबळे, बाबासाहेब कोडग, संजय सावंत, अप्पाराय बिराजदार, निलेश बामणे, अनिल शिंदे, तमाराया यामी, भारत गायकवाड, सुरेश खांडेकर, विनोद पवार, सह मान्यवर उपस्थित होते.