सोलापूर : सुरज राऊत
वीर कोतवाल शिक्षण संस्था सोलापूर यांचेवतीने शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यातील नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती वीर कोतवाल शिक्षण संस्थेचे संचालक व रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे माजी अध्यक्ष सचिन चौधरी यांनी दिली.
शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता सोलापूर शहरातील पार्क चौक येथील सिद्धेश्वर मंदिराशेजारी असणाऱ्या निर्मलकुमार फडकुले सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
हा गुणवंतांचा सन्मान सोहळा छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील प्राध्यापक डॉ. रोटे. संजय अस्वले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल हुलसुरकर, बीड येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर झांबरे, मंगळवेढा येथील ज्येष्ठ साहित्यिक व कवीवर्य गोरक्ष जाधव, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे बार्शी तालुकाध्यक्ष, नगरसेवक नागजी दुधाळ, उद्योगपती दिलीप देविदास राऊत, ज्येष्ठ समाजसेवक नीलकंठ हल्लाळीकर उपस्थित राहणार आहेत.
या सन्मान सोहळ्यात प्रेमा राऊत, नरेंद्र गंगधरे, प्रा. ज्ञानेश्वर काळे, सचिन जाधव, मृणालिनी शिंदे, रामभाऊ डिगे, माधुरी पारपल्लीवार, किशोर शेटे, शिवशरण सुरवसे, रोहिणी चौधरी, मंगेश राऊत, नंदकुमार दळवी, ओंकार भालेकर, पृथ्वीराज शिंदे, प्रभाकर शेटे, आकांक्षा माने, ऋषिकेश गाडेकर, श्रीधर इंगळे, संतोष राऊत, श्वेता दळवी, ईश्वरी राऊत, प्रज्वल राऊत यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे वीर कोतवाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश दळवी यांनी सांगितले.
सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी पक्षनेते, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्ह्यातील नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी सर यांनी स्थापन केलेल्या वीर कोतवाल शिक्षण संस्थेने नाभिक समाजासाठी आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. या संस्थेच्या माध्यमातून चौधरी परिवाराने समाजातील अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावला आहे.
समाजातील अनेक वंचित घटकांना प्रवाहात आणून त्यांना बळ देऊन उभे करण्याचे कामही पांडुरंग चौधरी सर यांनी मोठ्या तळमळीने केले आहे. त्यांनी समाजातील गरीब व होतकरू तरुणांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे काम अविरतपणे केले आहे. पांडुरंग चौधरी सर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान व्यक्तीच्या या सन्मान सोहळ्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील समाजबांधव, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वीर कोतवाल शिक्षण संस्थेचे संस्थापक पांडुरंग चौधरी सर, अध्यक्ष गणेश दळवी, मल्लिनाथ चौधरी, सिद्धेश्वर आगाशे, विजयकुमार माने सर, सुनील इंगळे, सचिन पांडुरंग चौधरी, प्रा. डॉ. गणपती वाघमोडे, दिनेश गवळी, भगवानराव काशीद, भारत शिंदे यांनी केले आहे.