टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलच्या यशवंत मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय 14 व 17 वर्षीय खो खो स्पर्धेमध्ये छत्रपती खो-खो क्लब मरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या हनुमान विद्यामंदिर मरवडेच्या 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने घवघवीत यश मिळवले.
यामध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात डोणज संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक मिळवत संघाची जिल्हास्तरीयसाठी स्पर्धेसाठी निवड झाली. 17 वर्षाखालील मुलांच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.
विजेत्या व उपविजेत्या संघाला छत्रपती खोखो क्लबचे सर्वेसर्वा सुदर्शन घुले, मिनाजभाई इनामदार, रोहित कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या या घवघवीत यशाबद्दल हनुमान विद्यामंदिर व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य हनुमंत वगरे, पर्यवेक्षक हनुमंत केंदुळे, क्रीडा शिक्षक अण्णासाहेब जाधव, मार्गदर्शक शिक्षक महावीर कांबळे व सुनील सोनार यांनी अभिनंदन केले.
तसेच राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी मैदानावर विजेत्या संघाचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करुन अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.