टीम लोकमन सांगोला |
संपूर्ण देशातील नाभिक समाजाचे श्रद्धास्थान असलेले नाभिक समाजाच्या उन्नती आणि उत्कर्षासाठी अहोरात्र झटणारे, समाजासाठी अवघे जीवन समर्पित करणारे, तळागाळातील नाभिक समाजाचा आवाज, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष समाजभूषण भगवानराव बिडवे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
नाभिक समाजाचे राष्ट्रीय नेते भगवानराव बिडवे हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ते दुपारी सांगोला येथे नाभिक समाज बांधवांच्या उपोषण स्थळी भेट देणार असल्याची माहिती राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष शंकर काळे यांनी दिली.
राष्ट्रीय नेते भगवानराव बिडवे यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुणे येथून सोलापूरकडे प्रयाण दुपारी 1 वाजता अकलूज येथे शासकीय विश्रामगृहावर आगमन व राखीव, 1.30 वाजता वेळापूर येथे नाभिक समाजाचे युवक नेते किरण भांगे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट व माळशिरस तालुक्यातील समाज बांधवांशी संवाद, दुपारी 2.30 वाजता सांगोला येथे नाभिक समाज बांधवांच्या उपोषण स्थळी भेट व समाज बांधवांशी संवाद, 3.30 वाजता नाभिक समाजातील युवा उद्योजक सोमनाथ खंडागळे यांच्या बाईक शोरूमला सदिच्छा भेट त्यानंतर एका खाजगी कार्यक्रमासाठी कोल्हापूरकडे प्रस्थान.
राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे यांचे समवेत राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे प्रदेश चिटणीस अभिजीत बने, युवक नेते किरण भांगे, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे प्रदेश संघटक सुहास गाडेकर, विभागीय सरचिटणीस मल्लिनाथ चौधरी, महिला आघाडीच्या नेत्या डॉ. माधुरी पारपल्लीवार, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रघुनाथ जगताप, पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष शंकर काळे यांचेसह राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भगवानराव बिडवे साहेब हे आज दुपारी अडीच वाजता सांगोला तहसील कार्यालय परिसरात सुरू असलेल्या नाभिक समाज बांधवांच्या उपोषण स्थळी भेट देणार असून यावेळी सांगोला तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे सांगोला शहराध्यक्ष गौरव काळे यांनी केले आहे.