टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा शहरातील नामांकित सुवर्णपेढी असलेल्या अमोल रत्नपारखी ज्वेलर्सच्या वतीने ग्राहकांसाठी राबविण्यात आलेल्या ‘खरेदी दागिन्यांची ट्रीप दुबईची’ या योजनेचा बक्षीस वितरण समारंभ व ग्राहक कृतज्ञता सोहळा तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अमोल रत्नपारखी ज्वेलर्सचे संचालक अनिल रत्नपारखी यांनी दिली.
मंगळवेढा शहरालगत असलेल्या जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. अमोल रत्नपारखी ज्वेलर्सच्या वतीने ग्राहकांसाठी ‘खरेदी दागिन्यांची ट्रीप दुबईची’ हि योजना राबविण्यात आली होती. या योजनेस ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या योजनेतील सहभागी ग्राहकांना कुपन्स देण्यात आली होती. याच कुपन्समधून आज या योजनेचा विनर घोषित होणार आहे. ज्याला मिळणार आहे अमोल रत्नपारखी ज्वेलर्सकडून दुबई ट्रिपची सुवर्णसंधी. तसेच उपस्थित महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम रंगणार असल्याचेही अमोल रत्नपारखी ज्वेलर्सच्या संचालिका सौ. श्रद्धा अमोल रत्नपारखी यांनी सांगितले.
हा कार्यक्रम पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचे शुभहस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, धनश्री व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अरुणाताई माळी, भैरवनाथ शुगर लवंगी युनिटचे चेअरमन अनिल सावंत, जकराया शुगर लिमिटेडचे चेअरमन ॲड. बिराप्पा जाधव, मंगळवेढा व्यापारी कमिटीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मंगळवेढा शाखेचे मॅनेजर सुनील बिडगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
123 वर्षांपूर्वी सुरू झालेली सुवर्णपरंपरा आज रत्नपारखींच्या चौथ्या पिढीतही मोठ्या दिमाखात अखंडितपणे कार्यरत आहे. अमोल रत्नपारखी यांच्या पणजोबांनी 123 वर्षांपूर्वी कुडाच्या शेनाने सारवलेल्या छोट्याशा छपराच्या घरात सुरु केलेली ही सुवर्णपेढी दिवसेंदिवस बहरतच गेली. आज रत्नपारखींची चौथी पिढी ही सुवर्णपेढी मोठ्या दिमाखात चालवत आहे. 123 वर्षांपूर्वी शेणाने सारवलेल्या कुडाच्या छपरात सुरू झालेला हा व्यवसाय आज अतिशय मोठ्या भव्य दिव्य अशा वातानुकलीत दालनामध्ये मध्ये रूपांतरित झाला आहे.
रत्नपारखींच्या चौथ्या पिढीतील अमोल रत्नपारखी व श्रद्धा रत्नपारखी यांनी या व्यवसायामध्ये नाविन्य व आधुनिकता आणली असून नुकतेच अमोल रत्नपारखी या सुवर्णपेढीचे मोठ्या शोरूममध्ये रूपांतर केले आहे. परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचा सुरेख संगम या दालनामध्ये पाहायला मिळतो. ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर या सुवर्णपेढीची अतिशय दैदिप्यमान अशी वाटचाल सुरू आहे.
या सुवर्णपेढीचे संचालक अमोल रत्नपारखी व श्रद्धा रत्नपारखी यांच्या कल्पकतेतून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. आजही ग्राहकांचा मोठा विश्वास या सुवर्णपेढीवर असल्याचे पाहायला मिळते. या पेढीमध्ये अतिशय कुशल व विनम्र कर्मचारी वर्ग असल्याने ग्राहकांना तत्पर व आदरयुक्त सेवा दिली जाते. यामुळे ग्राहकांचा अमोल रत्नपारखी ज्वेलर्सवर असलेला विश्वास अधिकच वृद्धिंगत होत आहे.
अमोल रत्नपारखी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अमोल रत्नपारखी हे यशस्वी उद्योजक आहेतच शिवाय सामाजिक कार्यातही ते सक्रिय असतात. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांवर ते कार्यरत असून सध्या ते रोटरी क्लब ऑफ मंगळवेढाचे सिटीचे प्रेसिडेंट म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवीत आहेत. रोटरीच्या माध्यमातून उठावदार सामाजिक कार्य त्यांनी केले आहे.
जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणाऱ्या ‘खरेदी दागिन्यांची ट्रिप दुबईची’ या योजनेचा बक्षीस वितरण समारंभ व ग्राहक कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमासाठी ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अमोल रत्नपारखी ज्वेलर्सच्या संचालिका सौ. अनुराधा अनिल रत्नपारखी यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवप्रिया रत्नपारखी, साक्षी रत्नपारखी, चैतन्य रत्नपारखी यांचेसह अमोल रत्नपारखी ज्वेलर्सचा सर्व स्टाफ व अमोल रत्नपारखी मित्रपरिवार परिश्रम घेत आहे.