टीम लोकमन सांगली |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानाला अवघे काही दिवस बाकी असतानाच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे खिंडार पडले आहे. भाजपचा सांगलीतील अल्पसंख्यांक चेहरा असलेले नेते मुन्ना कुरणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीमध्ये मुन्ना कुरणे हे स्वग्रही परते आहेत. सांगली जिल्ह्यातील भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सांगलीचे जुने काँग्रेस नेते आणि सध्याचे भाजपा नेते मुन्ना कुरणे यांनी आज आपल्या सर्व समर्थकांसह भाजपाला ‘जय श्रीराम’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत मुन्ना कुरणे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गेल्या अनेक महिन्यापासून भाजपामध्ये मुन्ना कुरणे यांची कोंडी होत असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे ते पक्षात फारसे सक्रीय दिसत नव्हते. अखेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुन्ना कुरणे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत डॉ. विश्वजीत कदम, सांगलीचे काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुन्ना कुरणे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे सांगलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भाजपकडे मुन्ना कुरणे यांच्या रुपाने सांगलीत एक मुस्लिम चेहरा होता. मात्र त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मुस्लिम समाजाला पुरेस प्रतिनित्व मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कुरणे यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
मोदी, शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच भाजपला धक्का
विशेष बाब म्हणजे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच सांगलीमध्ये भाजपला धक्का बसला आहे. मुन्ना कुरणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. तर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सांगलीमध्ये भाजपकडून सुधीर गाडगीळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.