टीम लोकमन मंगळवेढा |
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. येथील ब्यादगी तालुक्यात शुक्रवारी एक मिनी बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
तीर्थयात्रेवरून परतत होते सर्व भावीक…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भावीक शिवमोगाचे रहिवासी होते. ते देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथून परतत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा संशय…
बसचालकाला झोप लागल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.