टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा शहरातील युवा उद्योजक उद्योजक व 123 वर्षांची सुवर्णपरंपरा असलेली मंगळवेढ्यातील नामांकित सुवर्णपेढी अमोल रत्नपारखी ज्वेलर्सचे संचालक अमोल रत्नपारखी यांना ‘हॉल ऑफ फेम’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित एका कार्यक्रमात दैनिक भास्कर समूह व ९५ माय एफएम यांचे वतीने सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रिया मराठे यांच्या शुभहस्ते ‘हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार देऊन अमोल रत्नपारखी यांना सन्मानित करण्यात आले.
१२३ वर्षांपूर्वी सुरू झालेली सुवर्णपरंपरा आज चौथ्या पिढीतही मोठ्या दिमाखात अखंडितपणे कार्यरत आहे. अमोल रत्नपारखी यांच्या पणजोबांनी १२३ वर्षांपूर्वी कुडाच्या शेनाने सारवलेल्या छोट्याशा छपराच्या घरात सुरू केलेली ही सुवर्णपेढी दिवसेंदिवस बहरतच गेली. आज रत्नपारखींची चौथी पिढी ही सुवर्णपेढी मोठ्या दिमाखात चालवत आहे. १२३ वर्षांपूर्वी शेणाने सारवलेल्या कुडाच्या छपरात सुरू झालेला हा व्यवसाय आज अतिशय मोठ्या वातानुकलीत दालनामध्ये मध्ये रूपांतरित झालाय.
रत्नपारखींच्या चौथ्या पिढीतील अमोल रत्नपारखी यांनी या व्यवसायामध्ये नाविन्य व आधुनिकता आणली असून नुकताच अमोल रत्नपारखी या सुवर्णपेढीचे मोठ्या शोरूम मध्ये रूपांतर केले आहे. परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचा सुरेख संगम या दालनामध्ये पाहायला मिळतो. ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर या सुवर्ण पेढीची अतिशय दैदिप्यमान अशी वाटचाल सुरू आहे. या सुवर्ण पेढीचे संचालक अमोल रत्नपारखी व श्रद्धा रत्नपारखी यांच्या कल्पकतेतून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. आजही ग्राहकांचा मोठा विश्वास या सुवर्ण पेढीवर असल्याचे पाहायला मिळते. या पेढीमध्ये अतिशय कुशल व विनम्र कर्मचारी वर्ग असल्याने ग्राहकांना तत्पर व आदरयुक्त सेवा दिली जाते. यामुळे ग्राहकांचा अमोल रत्नपारखी ज्वेलर्स वर असलेला विश्वास अधिकच वृद्धिंगत होत आहे.
अमोल रत्नपारखी यांना याअगोदरही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमोल रत्नपारखी हे यशस्वी उद्योजक आहेतच. शिवाय सामाजिक कार्यातही ते सक्रिय असतात. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांवर कार्यरत असून सध्या ते रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. रोटरीच्या माध्यमातून उठावदार सामाजिक कार्य त्यांनी केले आहे.