माडग्याळ : नेताजी खरात
कुंभारी येथे एका वृद्ध व्यक्तीला किरकोळ कारणावरून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मारहाण केल्याने पाच जणावर आर्म ॲक्ट या कलमाने गुन्हा दाखल झाला होता. आरोपींना अटक व्हावी म्हणून ग्रामस्थांनी रस्ता रोको केला होता. ही घटना मंगळवारी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती.
याबाबतची फिर्याद बाबुराव महादेव जाधव यांनी जत पोलिसात दिली होती. पोलिसांनी बुधवारी पाच जणांना अटक करून न्यायालय समोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत आनंदा किसन सरगर (वय ३४) योगेश अरुण कांबळे (वय २८), प्रथमेश महादेव दुधाळ (वय २२), शंकर गणपती जाधव (वय २५) सर्व रा. संजयनगर सांगली यांना पोलिसांनी बुधवारी अडीच वाजण्याच्या सुमारास अटक केली व न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
कुंभारी येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रथमेश पान शॉप या ठिकाणी संशयित गेले होते. यावेळी त्यांनी बाबुराव महादेव जाधव यांना गुटखा मागितला असता त्यांनी माझ्याकडे गुटखा विक्रीसाठी नाही असे सांगितले. यातूनच वाद झाला संशयीतांनी जाधव यांना मारहाण केली होती. यावेळी रिव्हॉलरचा धाक दाखवला होता. यामुळे वातावरण भीतीदायक बनले होते. कुंभारी गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे.