देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी मंगळवेढा व माजी सैनिक संघटना मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य शिबिरात 378 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आल्याची माहिती महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटीच्या संचालिका डॉक्टर पुष्पांजली शिंदे व माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर मल्लया स्वामी यांनी दिली.
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, पॅथॉलॉजी लॅब टेस्ट, टू डी इको, डिजिटल एक्स-रे, सिटीस्कॅन, ईसीजी, सोनोग्राफी, औषधे मोफत दिल्याने अनेक गरीब व गरजू रुग्णांना या शिबीराचा फायदा झाल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या शिबिरामध्ये कन्सल्टींग फिजिशियन व इंटेन्सिव्हीस्ट डॉक्टर अविनाश सुरवसे, सुप्रसिद्ध छाती व दमा विकार तज्ञ डॉक्टर विशाल फडे, जनरल सर्जन डॉक्टर अरविंद गिराम, मूत्र व किडनी विकार तज्ञ डॉक्टर अनिल केसकर, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर धनंजय गावडे, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अमित गुंडेवार, बालरोग व नवजात शिशु तज्ञ डॉक्टर महेश कोनळ्ळी, सोनोग्राफी व क्ष किरण तज्ञ डॉक्टर दत्तात्रय घोडके, दंतरोग तज्ञ डॉक्टर सौ.स्नेहा सुरवसे- माकणीकर, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉक्टर पुष्पांजली शिंदे आदी तज्ञ डॉक्टरनी उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी केली. महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटीचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल शेजाळ यांनी या आरोग्य शिबिराचे समन्वयक म्हणून काम पाहिले.
या शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे विकार, हृदयाचे विकार, कावीळ, स्वादुपिंडाचे विकार, पित्तविकार, फिट, झटके, दमा, अॅलर्जी, जुनाट सर्दी व खोकला, क्षयरोग, फुफ्फुस, गर्भाशयाची पिशवी, मानेवरील व पोटातील टीबीच्या गाठी, मणक्याचा व मेंदूचा टीबी, न्युमोनिया, धुम्रपानामुळे होणारे श्वसनविकार, कोरोना व कोरोना नंतर उद्भवणाऱ्या फुप्फुसाच्या समस्या, झोपेचे विकार, झोपेत जास्त घोरणे, झोपेत श्वास बंद होणे, अंतर कोशिय फुफ्फुसविकार, हर्णीया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, पोटातील गाठी, स्तनाच्या गाठी, पोटाचे सर्व विकार, सांधेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार, गुडघेदुखी, बालरोग विभाग, न्युमोनिया, बालदमा, लहान मुलांची कावीळ, झटके येणे, बालकांचे ह्रदयविकार, बालकांचे मेंदू विकार, अॅलर्जी इत्यादी आजारांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.
या शिबीराचे उद्घाटन मंगळवेढा तालुक्यातील येड्रावचे सुपूत्र शहीद किसन माने यांच्या पत्नी वीरपत्नी शामल किसन माने यांचेहस्ते धन्वंतरी पुजनाने झाले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. डॉक्टर नंदकुमार शिंदे, डॉक्टर धनंजय गावडे, डॉक्टर सदानंद माने, डॉक्टर सतीश डोके, डॉक्टर विशाल फडे, डॉक्टर अमित गुंडेवार, डॉक्टर अविनाश सुरवसे, डॉक्टर स्नेहा सुरवसे, डॉक्टर अरविंद गिराम, डॉक्टर राहूल शेजाळ, डाॅक्टर अनिल केसकर, दशरथ फरकंडे, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर मल्लय्या स्वामी, सचिव चंगेजखान इनामदार, उपाध्यक्ष मुबारक मुलानी, कृष्णनाथ लिगाडे, महादेव दिवसे, दयानंद गायकवाड, मच्छिंद्र कोळेकर, भारत शिंदे, किसन पडवळे, शंकर जाधव, प्रकाश लिगाडे, मुरलीधर घुले, दावल इनामदार डॉक्टर पुष्पांजली शिंदे, शिक्षक नेते मल्लिकार्जुन माळी, चोखामेळानगरच्या उपसरपंच अनिता कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरचे शिबिर यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा हेल्थ एलएलपी चे संचालक डॉक्टर मधुकर कुंभारे, डॉक्टर श्रीनिवास कोरुलकर, डॉक्टर सुरेश होनमाने, डॉक्टर सौ.तनुजा होनमाने, डॉक्टर राजेंद्र जाधव, डॉक्टर मल्लाप्पा माळी, डॉक्टर नितीन आसबे, डॉक्टर सतीश डोके, डॉक्टर सौ.अश्विनी डोके, डॉक्टर संतोष मेटकरी, डॉक्टर सौ.अर्चना मेटकरी, डॉक्टर अमोल बुरांडे, डॉक्टर सौ.नीलिमा बुरांडे, डॉक्टर आनंद जगताप, डॉक्टर सदानंद माने, डॉक्टर सौ.वसुधा माने, डॉक्टर विजयकुमार धायगुंडे, डॉक्टर सचिन बनसोडे, डॉक्टर प्रकाश स्वामी, डॉक्टर सुनील जाधव, डॉक्टर दत्तात्रय क्षीरसागर, डॉक्टर विजय नडगेरी, डॉक्टर सौ. स्मिता नडगेरी, डॉक्टर सौ.शुभांगी शिंदे, डॉक्टर प्रसाद कोरुलकर, डॉक्टर सौ.पौर्णिमा कोरुलकर, डॉक्टर बिराप्पा निळे, डॉक्टर पुष्पांजली शिंदे, डॉक्टर सौ.शुभांगी अहिरे महिला हाॅस्पिटल अॅण्ड मल्टिस्पेशालिटीचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहूल शेजाळ, डॉक्टर चेतन मलखांबे, डॉक्टर वैभव डोंगरे, डॉक्टर सागर भेंकी, डॉक्टर अमृता शिंदे, डॉक्टर सुजाता गायकवाड, डॉक्टर दादासाहेब शेंडगे, डॉक्टर अतुल गायकवाड, व्यवस्थापक भारत शिंदे, मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, सादिक शेख, भांडार अधिकारी सौ. प्रियांका शेजाळ, संतोष कोळसे-पाटील, मल्लिकार्जुन रोडगी, अर्चना चंदनशिवे, झुंबरलाल हिल्लाळ, धनश्री घाटूळ, कृष्णा माने, ज्योतीराम जाधव, राणी इंगळे, संदीप यादव, गुरुनाथ शिवशरण, आदित्य लोखंडे, प्रशांत खवतोडे, गणेश कोरे, मारुती कांबळे, रमेश व्हणेकर, अभिजित पवार, खरात, मोरे, कांबळे, राहुल काकेकर, नागार्जुन शिंदे, स्वाती शिंदे, कांचन करे, आरती बंदपट्टे, तृप्ती कुलकर्णी, शाहीन मुजावर, सविता गाडवे, ज्योती चव्हाण, माधुरी माळी, सागर कोळी, निलोफर शेख, स्वाती पाटील, शैलेश गवळी, माधुरी पारगावकर, शशिकांत काळे, सुजाता लोकरे, नकुशा मस्के, पौर्णिमा लोकरे, शकुंतला खरबडे, स्नेहा शेंबडे, प्रतिभा तोंडसे, आरती लोकरे, नितीन वाघमारे यांचेसह महिला हॉस्पिटल अॅण्ड मल्टीस्पेशालिटीचा संपूर्ण स्टाप व माजी सैनिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
क्षणचित्रे….
1) या शिबिराचे उद्घाटन मंगळवेढा तालुक्यातील येड्राव गावचे सुपुत्र शहीद किसन माने यांच्या पत्नी वीरपत्नी शामल किसन माने यांच्या शुभहस्ते करून महिला हॉस्पिटल ने शहीद पत्नीचा सन्मान केला.
2) या शिबिराला मंगळवेढा पंढरपुर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आमदार समाधान दादा अवताडे यांनी भेट देऊन या स्तुत्य उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. डॉक्टर पुष्पांजली शिंदे व महिला हॉस्पिटल च्या संपूर्ण स्टाफचे अभिनंदन करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सर्व महागड्या तपासण्या आणि औषधे मोफत देऊन केलेल्या रुग्णसेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
3) इंडियन मेडिकल असोसिएशनचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष व नामवंत बालरोग तज्ञ डॉक्टर मधुकर कुंभारे यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. सहभागी डॉक्टरांना शुभेच्छा देऊन सदर शिबिराच्या यशस्वी संयोजनाबद्दल डॉक्टर पुष्पांजली शिंदे व त्यांच्या टीमचे कौतुक केले.
4) मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ नेते व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक बबनराव आवताडे यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांना मिळत असलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. सर्व डॉक्टरांचे अभिनंदन करून असे उपक्रम वारंवार राबवावेत व या माध्यमातून गरीब व गरजू रूग्णांची सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
5) भारतीय सैन्यदलाच्या मेडिकल कोअरचे मेजर जनरल हिरदेश सहानी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देऊन महिला हॉस्पिटल व माजी सैनिक संघटनेच्या कार्याचे कौतुक केले व मोफत आरोग्य शिबिराच्या संयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.