टीम लोकमन सांगोला |
रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्यावतीने रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी गेजगे मळा, कडलास येथील रामचंद्र गेजगे यांना वतीने शेळी भेट देण्यात आली.
रामचंद्र गेजगे व त्यांची पत्नी दररोज काबाड कष्ट करून आपले कुटुंब चालवतात. त्यांना दोन लहान मुले आहेत. त्यापैकी मोठा १० वी मध्ये व लहान मुलगा ८ वी मध्ये शिकत आहे. दररोज मोलमजुरी करून हे कुटुंब आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रोटरी क्लबच्या वतीने या कुटुंबास स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत व्हावी म्हणून शेळी देण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी ही भेट त्यांना मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान व उत्साह बघून रोटरी क्लब ने पुन्हा पुन्हा असे उपक्रम करावेत अशी सर्व सदस्यांची भावना झाली.
लाभार्थींनी त्या शेळीला पिले झाल्यानंतर त्यामधील एक शेळी अशाचप्रकारे रोटरी क्लब ज्यांना मदत करू इच्छिते त्यांच्यासाठी ती परत द्यावी. म्हणजे एका नंतर एक कुटुंबाची मदत करण्याची अशाप्रकारची चेन तयार होईल. असा रोटरी क्लबचा विचार आहे. अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. साजिकराव पाटील यांनी दिली.
या शेळीप्रदान कार्यक्रमाच्या प्रसंगी रोटरी क्लब सांगोलाचे २०२४-२५ चे अध्यक्ष रो.विकास देशपांडे, सचिव विलास बिले, रो.शरणप्पा हळळीसागर, रो. डोंबे गुरुजी, लाभार्थी महादेव गेजगे त्यांच्या पत्नी व मुलगा कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
हा कार्यक्रम रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.