नांदेड : उज्वला गुरसुडकर
शुक्रवार दिनांक 31मे रोजी सकाळी साडेसहा वाजता नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे तरुणाच्या सतर्कतेमुळे भीषण अपघात अपघात टळला. कंधार येथील शुरवीर महाराणा प्रतापचौकात अचानक सिमेंटने भरलेल्या टॅक्टरच्या ड्रायव्हरचा ताब सुटला आणि ट्रॅक्टर वेगाने धावत होते. यामुळे मोठा अनर्थ होणार हे लक्षात येताच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अलिम शेख यांनी ट्रॅक्टरचा ताबा घेतला आणि ट्रॅक्टर थांबविल्याने घडणारा मोठा अनर्थ तळला यामुळे अलीम शेख यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांनी स्वतः चे प्राण पणाला लावून भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टरच्या वर चढून थांबवण्यात यशस्वी ठरले. आणि जिवीतहानी टाळता आली. कंधार मध्ये महाराणा प्रताप चौक मेन रोड वर असल्यामुळे सतत ठिकाण प्रचंड गर्दी असते. चार ही बाजुने सतत येणारे वाहने मुख्य मार्केट असलेल्या या ठिकाणी सकाळी बराच जनसमुदाय आसतो.त्या मुळे ह्या भागात अनेक वेळा अपघात होत असतात.
सुदैवाने अलिम भाई येथे हजर होतो म्हणून त्यांनी ही मोलाची कामगिरी बजावली व अनेकांचे जिव वाचवले. या कामगिरी दखल घेऊन सद्दाम भाई कंधारी व अनेकांनी त्यांचा सत्कारही केला. शेख आलिम उर्फ अल्लु भाई यांच्या बहादुरिला सर्व कंधार वाशी सलाम करत आहेत. व त्याच्या या बहादुरीसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्याची अपेक्षाही करत आहेत.