टीम लोकमन मरवडे |
डेंग्यू हा एडीस इजिप्ती या डासापासून पसरणारा गंभीर विषाणुजन्य आजार आहे. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार व्यक्ती- डास- व्यक्ती असा असतो. या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्या, टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होतो. त्यामुळे डेंग्यू रोग टाळण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन मंगळवेढा तालुका हिवताप पर्यवेक्षक जयसिंग हेंबाडे यांनी केले.
जागतिक डेंग्यू दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे ता. मंगळवेढा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणुजन्य गंभीर तापाच्या लक्षणासारखीच असतात. अचानक थंडी वाजून ताप येणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, हाडे आणी सांध्यामध्ये वेदना होतात. अंगावर सूज आणी चट्टे येतात. शरीरावर पुरळ येतात. डेंग्यू रुग्णाला विश्रांतीची सर्वात जास्त गरज असते. तसेच डेंग्यू रुग्णानी सकस आहार घेणे गरजेचे असते.
यावेळी मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, महासिदध विद्यामंदीर व ज्युनियर कॉलेज डोणजचे प्राचार्य दादासाहेब वाघमारे, कोळी महासंघाचे तालुका अध्यक्ष रमेशआण्णा कोळी, मरवडेचे माजी सरपंच शिवाजी पवार, बाळासाहेब बनसोडे, नवनाथ जाधव गुरुजी, तंत्रस्नेही शिक्षक नानासाहेब जाधव गुरुजी, औषध निर्माण अधिकारी हणमंत कलादगी, आरोग्य निरिक्षक मोहन यादव, आरोग्य सेवक चंद्रकांत पवार, प्रमोदकुमार म्हमाणे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी वर्षा कांबळे, कनिष्ठ सहायक लाडलेसो मुलाणी, आरोग्य सेविका रूपाली तिरेकर, सीमा वाघमारे, उमा हुलवान, धानेश्वरी हिरेमठ, डाटा एन्ट्री ऑपरेटर माधुरी सचिन घुले, आशा गटपर्वतक पूजा येडसे, मेघा गायकवाड, सीमा सोनवणे, रंजना काळे, मोहन सरडे, बंदप्पा कोळी, आकाश बिराजदार, कुंडलिक होवाळे यांचेसह मरवडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.