टीम लोकमन पंढरपूर |
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी ता. पंढरपूर येथे शनिवार दिनांक २० एप्रिल रोजी प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांचे हृदयरोग चिकित्सा व हृदयरोग ॲडव्हान्स संशोधन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कोर्टी, रोटरी क्लब पंढरपूर, भारत विकास परिषद, इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), होमिओपॅथिक ग्रुप पंढरपूर, इनरव्हील क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर येथील सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. व्ही. ए. वोहरा, अकलूज येथील नामांकित अश्विनी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. एम. के. इनामदार, पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉ. अरविंद भोरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दिनांक २० एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी ता. पंढरपूर येथे हा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंढरपूर व परिसरातील डॉक्टर्स, इंजिनिअर्स, विधिज्ञ, उद्योजक, विद्यार्थी, तरुण, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक यांचेसह महिला बचत गट व परिसरातील नागरिकांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.