टीम लोकमन मंगळवेढा |
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सभापतींनी निलंबनाचा निर्णय घेतला.
अंबादास दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभापतींच्या विरोधात देखील विरोधकांनी मोठी घोषणाबाजी केली.