सांगोला : वनपरिक्षेत्र सांगोला मध्ये दि. 8 एप्रिल रोजी रात्रीची गस्त करत असताना रात्री 8 च्या दरम्यान सांगोला ते मिरज रस्त्यावर वाहनांची तपासणी केली असता टेम्पो क्र. KL 05 – 8942 यामध्ये कडूलिंब झाडाचे इमारती नग 18 त्याचे घनमीटर 2.042 मिळून आले.
कडूलिंब झाडांची विनापरवाना वृक्षतोड करून विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसुन आले. टेम्पो चालक महेश भारत मिसाळ (रा.चिणके) याचेकडे वनविभागाचा वाहतूक पास नसल्यामुळे सदरचा टेम्पो कडूलिंब इमारती लाकुड मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सांगोला शेजारी ठेवण्यात आला आहे.
वनरक्षक सांगोला यांचा प्र.गु.क्र.ओ-04/2024 दि.08.04.2024 नुसार नोंद केला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला कार्यालयाकडून वृक्षतोड परवाना व वाहतूक पास परवाना न घेतल्याने कारवाई करण्यात आली. सदरची वृक्षतोड मालकी क्षेत्रातील आहे. त्याचा तपास चालू आहे. टेम्पो मधील इमारती लाकडाची किंमत अंदाजे 30,000 रुपये आहे.
सदरची कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे एन.आर. प्रवीणसाहेब, उपवनसंरक्षक, सोलापूर धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक (कॅम्पा) सोलापूर बी.जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची कारवाई तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, एस. एल. मुंढे वनपाल सांगोला, वनरक्षक सांगोला जी.बी. व्हरकटे, तसेच वनमजूर वसंत शिंदे यांच्या पथकाने केली.