माडग्याळ : नेताजी खरात
सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या सूचनेप्रमाणे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलीस कर्मचारी यांचे एक पथक तयार करून अवैद्य गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने आज दिनांक २६ जुलै २०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक शासकीय वाहनाने अंकलगी ते उटगी रोडने पेट्रोलिंग करीत असताना मालवाहू ट्रक क्रमांक KA 29 A 2588 भरधाव वेगाने जात होता.
सदर वाहनाचा संशय आल्याने त्या मालवाहतूक ट्रकला थांबवून चालकाचे नाव गाव विचारताच त्याचे नाव रवी अर्जुन होळकर वय 34 वर्षे राहणार कासरूडी यवत, तालुका दौंड जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले. नमूद वाहन चालकास त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का, तसेच त्या वाहनामध्ये कोणता माल भरला आहे. त्याबाबत विचारणा केली असता तो काही समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला.
त्याचा संशय आल्याने सदरचा मालवाहू ट्रक उमदी पोलीस ठाणेस घेऊन जाऊन पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष रवी होळकर यांच्या ताब्यातील वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू व गुटखा मुद्देमाल मिळून आला. त्याबाबत त्याच्याकडे विचारण्यात केली असता त्यांनी सांगितले की, सदर गाडीमध्ये सुगंधी असलेला पान मसाला व गुटखा मुद्देमाल हा मॉटी उर्फ दर्शन तुरेकर राहणार हडपसर पुणे यांचे सांगण्यावरून विजापूर येथून आणला असल्याची कबुली दिली.
लागलीच सदर ठिकाणी मिळून आलेल्या मुद्देमालातील गुटख्याचे रासायनिक तपासण्यासाठी सॅम्पल घेऊन पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल 73 लाख 60 हजार 820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फिर्याद दर्याप्पा दिगंबर बंडगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी दिली असून सदर आरोपीवर उमदी पोलीस ठाणे येथे बि.एन.एस.कलम 123, 223 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मालवाहू ट्रक व आरोपीस जेरबंद केले आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर लवटे, दरीबा बंडगर, अमर नरळे, आप्पासाहेब हाक्के, संतोष माने, आप्पासाहेब घोडके, पोलीस नामदार प्रकाश पाटील यांनी केली. पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहे.