टीम लोकमन मंगळवेढा
विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ) केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निलंबन केले होते.
दरम्यान या कारवाईचा फेरविचार करावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. त्यावर विचार केला असून अखेर उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी पाच दिवसांचा होता तो आता 3 दिवसांचा केला असून उद्यापासून दानवे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. दानवे यांच्यावर पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
मला हे प्रकरण ताणायचे नाही : प्रसाद लाड
यावर बोलताना भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले, हे प्रकरण मला जास्त ताणायचे नाही. याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच दानवे यांनीही पत्र पाठवून उपसभापतींकडे याबद्दल विनंती केली. त्यावर माझ्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. त्यामुळे या प्रकणात मला काही जास्त पुढे जायचे नाही. सरकार जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असेही आमदार प्रसाद लाड यावेळी म्हणाले.