टीम लोकमन मंगळवेढा |
अलिबाग रेवदंडा मार्गावर बेलवडे फाटा येथील वळणावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसला भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले असून 18 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी असून एकाचा पाय तुटला आहे तर दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघात स्थळी पोलीस प्रशासन एसटी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमींना मदत केली.
महाजने रेवदंडा ही राज्य परिवहन महामंडळाची बस रेवदंडाकडे जात होती. तर मुरुड बार्शी ही राज्य परिवहन महामंडळाची बस अलिबागच्या दिशेने येत होती. अक्षय येथील वळणावर दोन्ही बस समोरासमोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून दोन्ही बसनी एकमेकांना धडक दिली. या अपघातात महाजने रेवदंडा या बसच्या चालकाच्या पायाला व मुरुड बार्शी बसचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर बसमधील 18 ते 20 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थ व पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.