टीम लोकमन मंगळवेढा |
राज्याच्या राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे.
दिलीप वळसे पाटील पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. एकीकडे मंत्रिमंडळ बैठकीला दांडी तर दुसरीकडे वळसे पाटील हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील आता हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वळसे पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यास हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत आले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. मात्र आत पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वळसे पाटलांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे. तसेच ते पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देखील भेट घेणार असल्याची चर्चा आहे.
यापूर्वी देखील शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक धक्के दिले आहेत. आता वळसे पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.