टीम लोकमन मंगळवेढा |
ब्रह्मपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे
संचालक बिरुदेव कोकरे यांची मंगळवेढा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ब्रह्मपुरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ब्रह्मपुरीचे सरपंच तानाजी नाना पाटील व माजी सरपंच विजयसिंह पाटील यांचेहस्ते शाल, श्रीफळ, मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजन भैय्या पाटील, सिद्धेश्वर कोकरे, सतीश बापू पवार, आनंद पाटील, औदुंबर पाटील, बाळासाहेब पाटील, शंकर माळी, विक्रम पाटील, धनंजय रणे, माणिक बाबा पाटील, राजेंद्र रणे, विकास पुजारी, दत्तात्रय रणे बालाजी पुजारी, विनोद पुजारी, प्रशांत पाटील, शामराव खाडे, दादासाहेब खरकदारे, गजानन पुजारी, संजय लवटे, गुडोपंत कुंभार, मोहन पवार यांच्यासह ब्रह्मपुरी व परिसरातील नागरिक या छोटेखानी सत्कार समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रह्मपुरी येथील रहिवासी व ब्रह्मपुरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक असलेले बिरुदेव कोकरे यांच्या या निवडीबद्दल ब्रह्मपुरी ग्रामस्थांसह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय राहून हिरीरीने सहभाग घेणारे बिरुदेव कोकरे यांची झालेली निवड ही त्यांच्या कामाची पावती असून ब्रह्मपुरी ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब आहे.