टीम लोकमन सोलापूर |
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत मिरकले, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.