टीम लोकमन मंगळवेढा |
श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षण सप्ताहाच्या कौशल्य व डिजिटल उपक्रमातंर्गत दिनांक २६ जुलै या पाचव्या दिवशी कनिष्ठ स्तरावरील विदयार्थ्यांना सांस्कृतिक वारसा कळावा,पर्यटन विकासाचे महत्व, इतिहास समजण्यासाठी मानवी जीवनाचा बदल समजून घेण्यासाठी महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. जावेद तांबोळी यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तुचे जतन व संवर्धनाची माहिती सांगून विदयार्थ्यांना इतिहासाची ओळख करून दिली.
सुरवातीस महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. जावेद तांबोळी यांनी कोणी तरी शहीद झालेल्या व्यक्तीची आठवण म्हणून विरगळ दगड असतो, एखादी महिला सती गेली असेल तर तिची आठवण म्हणून सतीशिळा दगड असतो तर त्या कालखंडातील माहिती जनतेला कळावी यासाठी शिलालेख माहिती देत असतात. असे सांगून महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक वास्तुची छायाचित्रे दाखविली.
यावेळी मंगळवेढा शहरात सापडलेल्या पुरातन वस्तूचीं पाहणी करून अवशेषाचीं ओळख करून घेतली तसेच महाविद्यालयाने तयार केलेल्या बॉटेलिक गार्डनमधील औषधी वृक्षाची माहिती विद्यार्थ्यांना जिवशास्त्र विभागाचे प्रा.उत्तम सूर्यगंध यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी केले तर प्रा. श्रीराम पवार यांनी सूत्रसंचालन केले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. गोविंद गायगोपाळ, शैलेश मंगळवेढेकर, प्रा.धनंजय मेहेर, प्रा. निर्मला सावंत, प्रा. कविता क्षीरसागर, प्रा. प्रियांका क्षीरसागर यांचेसह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.