टीम लोकमन सोलापूर |
सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भव्य अशी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले आणि सर्वांचेच लक्ष वेधले.
कन्ना चौक येथून वाजत गाजत पदयात्रेला सुरुवात झाली. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले.
ही रॅली जोडभावी पेठ, चाटला कॉर्नर, घोंगडे वस्ती, गुरुदत्त चौक, विश्रांती चौक, बलिदान चौक, मंगळवार पेठ पोलिस चौकी, सराफ कट्टा, माणिक चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, नवी पेठ, मेकॅनिक चौक, भागवत टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे रवाना झाली. सुशीलकुमार शिंदे हे सुरवातीला पदयात्रेत सहभागी होऊन नंतर सिध्देश्वर कारखान्याकडे सुरेश हसापुरे यांचेसमवेत धर्मराज काडादी यांच्या मेळाव्याकडे रवाना झाले.
माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महेश कोठे, काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना नेते अमर पाटील, भीमाशंकर म्हेत्रे, बाबा मिस्त्री, विनोद भोसले, अशोक निम्बर्गी, यू. एन. बेरिया, आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, गणेश डोंगरे, नलिनी कलबुर्गी, जुबेर कुरेशी, तिरुपती परकीपंडला, संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवर, प्रमिला तूपलवंडे, संध्या काळे, अनुराधा काटकर यांचेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या भव्य रॅलीत सहभागी झाले होते.