आंधळगाव : गणेश पाटील
समुदायाच्या संपर्कात रहा आणि डेंग्यूला नियंत्रित करा याचा अर्थ जनतेच्या संपर्कात राहून डेंग्यू विषयीची प्रतिबंधात्मक माहिती जनतेमध्ये सांगून त्यांच्या माध्यमातून डेंग्यू नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव तालुका मंगळवेढा येथे आयोजित जागतिक डेंगू दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी डॉ. भीमराव पडवळे, डॉ. स्वप्नाली सावंत, आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन मनोज पाटील उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल, मंगळवेढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य आंधळगाव येथे जागतिक डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.
डेंग्यू विषयी प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत जनतेमध्ये जनजागरण करण्याची मोहीम संपूर्ण महिनाभर हाती घेतलेली आहे. यामध्ये डेंग्यू आजार लक्षणे उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे. याविषयी सविस्तर माहिती दिली. सर्व आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातुन विविध ठिकाणी माहिती देण्याचे आणि जनजागरण करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
जागतिक डेंग्यू दिवस साजरा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव येथील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, आरोग्य सेवक रणजीत लेंडवे, आरोग्य सेवक विशाल चौगुले, आरोग्य सेवक सोमनाथ करादगी, गोरख घोडके, आरोग्य सेविका श्रीमती शैला जाधव, श्रीमती गौरा कांबळे, श्रीमती नगमा मुलाणी, डॉ. शुंभागी शिंदे, डॉ. देशमुख, स्वप्नाली राठोड, डॉ. बालाजी बचुटे, डॉ. रमेश हांजगी, औषध निर्माण अधिकारी सुदर्शन पाटील, शरद गुंजेगावकर, भिष्मा ननवरे, अण्णा शिंदे, आशा गट प्रवर्तक अनिता कांळुगे, सारिका जाधव सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होते.