टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांना अन्नदान करण्यात आले. तसेच गरीब व गरजू मजुरांना धान्याचे वितरण करण्यात आले.
अन्नदान करणारा हा साक्षात प्राणदाता म्हटला जातो, प्राण हेच आपले सर्वस्व आहे, म्हणून प्राणदाता(अन्नदाता) सर्व काही देणारा असतो. म्हणून अन्नदान केल्याने सर्व दानांचे फळ प्राप्त होते. अन्नमेव यतो लक्ष्मी अन्नमेव जनार्दनः। म्हणहेच जिथे अन्न आहे तिथेच लक्ष्मी आहे कारण अन्न हे साक्षात भगवान जनार्दन (महाविष्णू) आहे.अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. जो मनुष्य नित्य अन्नदान करतो त्याला संसाराची सर्व फळे प्राप्त होतात. अन्नदान हे एखाद्याच्या कुवतीनुसार आणि सोयीनुसार केले पाहिजे. यामुळे परम कल्याणाची प्राप्ती होते. विशेषतः अन्नदान हा जीवनातील आदराचा घटक आहे. म्हणून गरजूंना अन्नदान केले पाहिजे, अन्नदान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि इहलोक आणि परलोकात सुख प्राप्त होते.
अन्न हा जीवनाचा मुख्य आधार असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखे आहे. अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते. धर्मात अन्नदान केल्याशिवाय कोणताही जप, तप, यज्ञ इत्यादी पूर्ण होत नाहीत. अन्न ही एकच गोष्ट आहे जी शरीराबरोबरच आत्म्यालाही तृप्त करते. त्यामुळेच काही दान करायचे असेल तर अन्नदान करा, असे सांगितले जाते.
सोमनाथ इंगळे मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. मंगळवेढ्यातील गरीब व गरजू मजुरांना धान्य वाटप करण्यात आले. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. रुग्णालयातील गरीब रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी समाधान इंगळे, बापू हेंबाडे, दत्ता हेंबाडे, युवराज बुरुंगले, सादिक शेख, चैतन्य माने, विकास हेंबाडे, दयानंद हेंबाडे, योगेश हेंबाडे, पियुष इंगळे, शिवण्या इंगळे यांचेसह सोमनाथ इंगळे मित्रपरिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.