टीम लोकमन सांगोला |
दिशा हॉस्पिटल सांगोला येथे मुख्यमंत्री साह्यता निधी योजना सुरू झाली आहे. तरी गरजू रुग्णांनी गुडघ्याच्या तसेच मांडीच्या खुब्याच्या सांधा बदलीचे ऑपरेशन म्हणजे TKR आणि THR साठी लाभ घ्यावा असे आवाहन दिशा हॉस्पिटलचे संचालक व सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. सचिन गवळी यांनी केले आहे.
सांगोला शहरातील कडलास नाका येथे असलेल्या दिशा हॉस्पिटलला नुकतेच वैद्यकीय क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचे समजले जाणारे राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र NABH नामांकन मिळाले असून या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री साहाय्यता निधी योजना अंतर्गत सांधेरोपण शस्त्रक्रिया, मणक्याचे ऑपरेशनसाठी मदत उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून दिशा हास्पिटल सांगोला येथे नुकतीच गणेशवाडी ता. मंगळवेढा येथील सिताराम सोळगे या रुग्णाच्या मांडीच्या खुब्याचे कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना इम्पोर्टेड सांधा बसवण्यात आला. (TOTAL HIP REPLACEMENT ) या योजनेमुळे रुग्णास शासनाकडून १ लाख रुपये मदत निधी मिळाला आहे.
दिशा हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेम कॅशलेस सुविधाही उपलब्ध झाली असून स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, ICICI लोम्बर्ड इन्शुरन्स कंपनी, MD इंडिया, MEDI ASSIST TPA.VOLO health TPA Universal Sompo Insurance ह्या कंपनीसाठी Cashless सुविधा उपलब्ध असल्याचे डॉ. सचिन गवळी यांनी सांगितले.