टीम लोकमन मंगळवेढा |
शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंगळवेढा येथे रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी कान नाक घसा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्रीती शिर्के व डॉ. शरद शिर्के यांनी दिली.
सोलापूर येथील कान नाक घसा तज्ञ डॉक्टर दीपेंद्र हुली हे गरजू रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. या शिबिरातील रुग्णांसाठी ऐकण्याची कॉम्प्युटरद्वारे तपासणीवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ऐकण्याच्या सर्व मशीनवर २० टक्के सवलत असून या मशीन हप्त्यावर देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रिया खर्चावर २५ टक्के सवलत मिळणार आहे. ॲलर्जी व सर्दीवरील तपासणी व लसीकरणावर ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
रविवारी १४ एप्रिल रोजी सकाळी १० ते २ या वेळेत होणाऱ्या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन कान नाक घसा तज्ञ डॉ. दीपेंद्र हुली, डॉ. शरद शिर्के व डॉ. सौ. प्रीती शिर्के यांनी केले आहे.