टीम लोकमन मंगळवेढा |
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशाला ही मंगळवेढ्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी व विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविणारी एक नामांकित प्रशाला होय. प्रशालेत विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जातात. 15 सप्टेंबर सर्वत्र ‘इंजिनियर डे’ म्हणून साजरा केला जातो. याचेच अवचित्य साधून प्रशालेत ‘इंजिनिअर डे ‘चा कार्यक्रम आयोजित केला होता.
यासाठी प्रशालेत नेहमी घेतल्या जाणाऱ्या ‘स्कॉलर चाट’ या उपक्रमांतर्गत प्रशालेत तानाजी बुरुंगले प्राचार्य, फेबटेक टेकनिकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्च पौंलिटेकनिक, सांगोला यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महान अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या फोटो पूजनाने करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांचा यथोचित सत्कार प्राचार्य सुधीर पवार यांचेहस्ते करण्यात आला. पाहुण्यांची ओळख सौ.अनिता केदार यांनी करून दिली.
त्यानंतर तानाजी बुरुंगले यांनी इंजिनियर म्हणजे काय त्यासाठी कोणत्या पदव्या घ्याव्या लागतात व इंजिनियरचे विविध प्रकार याविषयी विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. त्यानंतर विद्यार्थी व प्रमुख पाहुणे यांच्यात सुसंवाद सुरू झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे प्रमुख पाहुण्यांनी अतिशय समर्पक शब्दात दिली. त्यांच्या उत्तराने विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले.
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.