टीम लोकमन मंगळवेढा |
इंग्रजी भाषा दिनानिमित्त मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इंग्रजी भाषेशी संबंधित इतिहास, संस्कृती आणि यशाबद्दल सर्वांना माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘बार्ड ऑफ एव्हॉन’, विल्यम शेक्सपियरचा जन्मदिन आणि मृत्यूदिन २३ एप्रिल रोजी येतो. ते महान लेखक, कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. ज्यांनी साहित्य क्षेत्रात आपल्या अतुलनीय योगदानाने इंग्रजी भाषेवर अमिट प्रभाव टाकला. भाषा लोकप्रिय करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.सागर वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य सुधीर पवार होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत आणि दीपप्रज्वलनाने झाली.
शाळेतील इंग्रजी शिक्षकांनी विल्यम शेक्सपियर यांच्या जीवनातील विविध छटा विशद केल्या.ते कवी, नाटककार म्हणून कसे होते आणि त्यांचा इंग्रजी साहित्यावर तसेच समाजावर झालेला प्रभाव उलगडला.
प्रमुख पाहुणे डॉ.सागर वाघमारे यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व आणि शेक्सपियरच्या जीवनातील टप्पे आणि त्यांचे साहित्य यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, व्यक्तींना परस्पर समंजसपणा वाढवण्यासाठी आणि विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींशी नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते. हे भाषेची विविधता, समृद्धता आणि सांस्कृतिक वारसा ठळक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. LSRW भाषेच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे, आपल्या जीवनावर आणि भाषेवर प्रेम करणे, स्वतःसोबत वेळ घालवणे, मानवी मूल्ये समजून घेणे यावर त्यांनी भर दिला.
मुख्याध्यापकांनी इंग्रजी शिकणे आणि बोलण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी पुस्तकांचे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकांची भूमिकाही स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांनी विविध मूल्ये आत्मसात करावी आणि विद्यार्थ्यांनी वाचनसमृद्ध व्हावे यासाठी शाळेने *” Selfie With Books “* हा अभिनव उपक्रम राबविला सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला.
यावेळी प्रशालेतील शिक्षिका अनिता केदार, प्रभा राजगुरू, नजमूल मुल्ला यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा यल्लाटीकर यांनी केले. तर रेणुका पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.