टीम लोकमन मंगळवेढा |
माझ्यासह माझे वडील आजोबा या शाळेचे विद्यार्थी असून इंग्लिश स्कूल हे नाव गेल्या साठ वर्षापासून या पंचक्रोशीत ज्ञानार्जन करीत असून अनेक पिढ्यांना ज्ञान देणारी ही मंगळवेढा तालुक्यातील नामवंत संस्था आहे. असे प्रतिपादन राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे यांनी केले. ते मंगळवेढा इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजच्या विभागाने आयोजित ज्ञानयोगी कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
डॉ. सुभाष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. पुष्पांजली शिंदे, नाईकवाडी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अश्विनी नाईकवाडी, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे संचालक डॉ. समाधान टकले, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव श्रीधर भोसले, प्राचार्य रवींद्र काशीद, यतीराज वाकळे, उदयसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी दलित मित्र कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्यासाठी साठी शिक्षण घेत असताना फक्त तेच ध्येय डोळ्यासमोर न ठेवता नर्सिंगसह वैद्यकीय मध्ये अन्य वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भविष्यात खाजगी व शासकीय या दोन्ही क्षेत्रांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
डॉ पुष्पांजली शिंदे यांनी बोलताना सांगितले की, आजकाल विद्यार्थी हे मेडिकल क्षेत्राशी संबंधित फक्त वैद्यकीय अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र या व्यतिरिक्त या क्षेत्रात अनेक नोकरीच्या संधी आहेत. तर त्या संधी मिळवण्यासाठी योग्य ते शिक्षण घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीधर भोसले यांनी कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना त्या कामातील कौशल्य आत्मसात करून नावलौकिक मिळवला पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी शिंदे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. स्वाती दिवसे यांनी केले तर आभार प्रा. संगीता ताड यांनी मानले. कार्यक्रमास इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेजच्या कला, वाणिज्य, शास्त्र, व्यवसाय शिक्षण विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.