टीम लोकमन मंगळवेढा |
मागील चार वर्षात बीशीच्या नावाखाली सोलापुरातील 131 जणांची तब्बल दोन कोटी 69 लाखाची फसवणूक झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून फसवणूक करणाऱ्या पती-पत्नी विरुद्ध सोलापूरच्या जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी लक्ष्मण आवार वय 37 वर्षे, साईबाबा चौक यांनी फिर्याद दिली आहे. यातील श्री ओम साई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा वय 44 वर्षे, खुशी रेसिडेन्सी, गीता नगर, थोरात हॉस्पीटल जवळ, सोलापूर व त्याची पत्नी सुजाता रमेश चिप्पा वय 40 वर्षे, या दोघांनी मिळून दि. 1/11/2020 पासुन ते 30/04/2024 दरम्यान बीशी चालवून लोकांचा विश्वास संपादन केला. जास्त रक्कम व्याजापोटी मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून श्री ओम साई फायनन्सच्या माध्यमातुन गुंतवणुकदारांच्या ठेवींच्या पैशाचा अपहार करुन फिर्यादी व यातील गुंतवणुक करणाऱ्या एकुण 131 व्यक्तिचा विश्वासघात करुन 2,69,19,000 (दोन कोटी, एकोणसत्तर लाख, एकोणीस हजार रुपये) इतकी फसवणुक केलेली आहे.
तसेच मला वारंवार धमकी देवु नका तसे केल्यास मी आत्महत्या करतो व त्यास तुम्ही सर्वजण जबाबदार राहाल अशी आम्हा सर्व गुंतवणुकदारांना धमकी देत होता. म्हणुन वरील फिर्यादी लक्ष्मण आवर यांनी 131 व्यक्तींचा प्रतिनिधी म्हणुन दिलेल्या फिर्यादीवरून रमेश चिप्पा व त्याची पत्नी सुजाता चिप्पा या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.