जत : पांडुरंग कोळळी
जत तालुक्यातील जाडर बोबलादच्या माजी सरपंच सौ. धानम्मा ईश्वराप्पा रविपाटील (वय: ६५) यांचे गुरूवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रविपाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनामुळे जत तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सौ. धानम्मा रविपाटील यांच्यावर सांगली येथे मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. बुधवार पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वराप्पा रविपाटील, तीन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सौ. धानम्मा रविपाटील यांनी जाडरबोबलाद गावच्या सरपंच म्हणून अत्यंत उत्कृष्ट कारभार केला. त्यांचे पार्थिव सकाळी जाडरबोबद गावी आणण्यात येणार आहे. त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता लिंगायत धर्म परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.