टीम लोकमन पंढरपूर |
स्पायना बायफिडा फाउंडेशन मुंबई, नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल पंढरपूर, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर, स्त्री आरोग्य संघटना आणि अग्रज हॉस्पिटल पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बालकातील जन्मजात व्यंग व आजाराचे मोफत निदान व समुपदेशन शिबिर शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी डॉ. शीतल शहा यांचे नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल पंढरपूर जि. सोलापूर येथे संपन्न झाले या शिबिरात जन्मजात व्यंग असलेल्या ५१ बालकांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते व डॉ. संतोष करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी डॉ. स्नेहा सावंत, डायरेक्टर उमा काळेकर, डॉ. शितल शहा, डॉ. महेश तळपल्लीकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सुडके, इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूरचे अध्यक्ष डॉ. सुनील कारंडे, वैद्यकीय अधिकारी कुलदीप डोके, अग्रज हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदेश दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने व बाह्य संपर्क अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. या शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून जन्मजात व्यंग असणाऱ्या ५१ बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम कदम यांनी केले तर बालरोग तज्ञ डॉ. सुधीर आसबे यांनी आभार मानले.