जत : पांडुरंग कोळळी
साई चारिटेबल ट्रस्ट संचलित साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जत यांच्या वतीने जत तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 25 शाखांचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, साई हॉस्पिटलचे चेअरमन चंद्रकांत गुड्डोडगी, मोहन भैय्या कुलकर्णी यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका अधिकारी राजू कोळी, जत मार्केट यार्ड शाखेचे सचिव तानाजी काशीद आणि त्यांचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कार्यरत असणारे फिजिशियन डॉ. बसवराज उटगी व सर्जन डॉ. शिवानंद बिरादार यांचा परिचय करून देण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयांची एक वर्षासाठी मोफत उपचार करण्याची जबाबदारी साई हॉस्पिटलने घेतली.
मोहन भैय्या कुलकर्णी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी हॉस्पिटल, डॉक्टर आणि कर्मचारी यांचे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतल्याबद्दल कौतुक केले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगदीश माळी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.